सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (19:53 IST)

भाभा अणू संशोधन केंद्रात नोकरीची संधी; असा करा ऑनलाइन अर्ज

सरकारी नोकऱ्या हव्या असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) ने 266 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर केंद्राने जारी केलेल्या जाहिराती नुसार, विविध ट्रेडमध्ये स्टायपेंडरी ट्रेनी (1 आणि 2) सह वैज्ञानिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 30 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करू शकतील. अर्जादरम्यान, उमेदवारांना पदानुसार 150 ते 100 रुपये शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागेल.
 
– स्टायपेंडरी ट्रेनी साठी 1 पदे – 

पात्रता-  रिक्त पदांच्या संदर्भात अभियांत्रिकी व्यापारात डिप्लोमा हवा
रसायनशास्त्र संबंधित पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह B.Sc. 
 
वयोमर्यादा: अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 18 ते 24 वर्षे.
 
 दोन्ही पदांसाठी स्टायपेंडरी ट्रेनी – NTC (ITI) रिक्त पदांशी संबंधित व्यापारात दोन वर्षे / एक वर्ष कालावधी.
 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) साठी किमान 60 टक्के गुणांसह SSC किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह HSC. 
 
लॅब असिस्टंट आणि प्लांट ऑपरेटर पदांसाठी 60 टक्के गुणांसह विज्ञान प्रवाहात एच.एस.सी.
वयोमर्यादा: अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार 18 ते 22 वर्षे.–
 
वैज्ञानिक सहाय्यक (सुरक्षा) – अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा किमान 50 टक्के गुणांसह B.Sc. 
वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे.– 

तंत्रज्ञ (ग्रंथालय विज्ञान) – किमान 60 टक्के गुणांसह SSC किंवा HSC. तसेच लायब्ररी सायन्समध्ये किमान एक वर्षाचे प्रमाणपत्र. 
वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे.– 

तंत्रज्ञ (रिगर) – किमान 60 टक्के गुणांसह SSC किंवा HSC. तसेच, रिगर ट्रेडमध्ये किमान एक वर्षाचे प्रमाणपत्र. 
वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे.