1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

आवळा नवमी कथा

आवळा पूजन महत्त्वाच्या विषयात एका प्रसिद्ध कथेप्रमाणे एका युगात एका वैश्यच्या पत्नीला पुत्र रत्न प्राप्ती होत नव्हती. तेव्हा तिने आपल्या शेजारणीचे ऐकून भैरव देवाला एका मुलाची बळी दिली. याचे उलट फळ भोगावे लागले आणि महिला कुष्ठ रोगाने ग्रसित झाली. यावर ती पश्चात्ताप करू लागली आणि रोगमुक्त होण्यासाठी गंगेच्या शरणी गेली.
तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन करण्याचा सल्ला दिला. गंगेच्या सांगितल्याप्रमाणे तिने पूजन करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाली.
 
या प्रभावाने तिला दिव्य शरीर आणि पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा पडली.