चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा

chaitra gauri
Last Modified शुक्रवार, 27 मार्च 2020 (07:14 IST)
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीये पासून बसवतात. देवीला झोपाळ्यात बसवून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय तृतीया) पर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात.

गौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा केली जाते. स्त्रिया आपापल्याघरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्याश्या पाळण्यात गौर (अन्नपूर्णा) स्थापित करतात.

महिन्याभरातील कुठल्याही एका दिवशी सुवासिनींना जेवायला बोलवतात. संध्याकाळी हळदी-कुंकूवाचा थाट करतात. या दिवशी गौरीच्या ओवती-भोवती साज सज्जा करतात.

कोकणात तर घरी आलेल्या सुवासीनी आणि कुमारिकेचे पाय धुवून त्यांचा हातावर चंदनाचे लेप लावतात. त्यांची भिजवलेले हरभरे आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ खायला देतात. "गौरीचे माहेर" गाणे गातात. ही पद्धत फक्त कोकणातच दिसते.

महाराष्ट्रात तर गौरीचे हळदी-कुंकू करताना गौरी पुढे
सुंदर अशी आरास मांडली जाते. या महिन्यात गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे.

कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ, बत्तासे, कलिंगड, काकडी, कैरीचे पन्हे, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीस अर्पण केला जातो. घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते.

भारतात चेत्रगौर अन्यत्र प्रांतात पण साजरी केले जाते.

कर्नाटक- चैत्रगौर ही कर्नाटकातही मांडली जाते. गौरीचे पूजन करून सुवासिनींची भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरतात.

राजस्थान - या प्रांतात होळीच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिना सुरु होतो. त्या दिवशी गणगौर बसवितात. होळीची
राख आणि शेणाचे 16 मुटके करतात. भिंतीवर 16 हळद आणि 16 कुंकुवाच्या टिकल्या काढतात. त्याखाली मुटके मांडले जाते. हे मुटकेचं गौरीचे प्रतीक होय. गव्हाच्या ओंब्या, हळदीने याची पूजा करतात. ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्या जवळ कणसे ठेवली जाते. हे कणसे म्हणजे शंकराचे प्रतीक असे. एका कणसाला लाल पिवळा दोरा आणि केसांचा गुंता बांधला जातो. हे गौरीचे प्रतीक मानले जाते. या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या
1 कोरडं कुंकू लावा. 2 बुधवारी दुर्गेच्या देऊळात जावे. 3 पूर्व दक्षिण आणि नेऋत्य ...

श्रीकृष्णावर महामुनी उत्तंक यांना राग आला, मग पुढे काय झाले ...

श्रीकृष्णावर महामुनी उत्तंक यांना राग आला, मग पुढे काय झाले जाणून घ्या
श्रीकृष्ण स्वतः महाभारत होण्यापासून वाचवू शकले नाही या गोष्टीचा महामुनी उत्तंक यांना फार ...

आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक 'वट सावित्री व्रत', जाणून घ्या ...

आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक 'वट सावित्री व्रत', जाणून घ्या वृक्षाशी निगडित 12 विशेष गोष्टी
पुराणात असे स्पष्ट केले आहे की वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं वास्तव्य ...

वट सावित्री अमावस्या वट सावित्री पौर्णिमेहून वेगळी कशी काय

वट सावित्री अमावस्या वट सावित्री पौर्णिमेहून वेगळी कशी काय
वट सावित्रीचे व्रत कैवल्य वर्षातून दोन वेळा केले जाते. अनेक लोकं वैशाख अमावास्येला देखील ...

गंगा दशहरा 2020: जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

गंगा दशहरा 2020: जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवसी गंगा नदीचे अवतरण भारत भूमीवर ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...