1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

मोरपंखाचे महत्त्व

ND
घराच्या दक्षिण-पूर्वेकडे मोरपंख लावल्याने बरकत वाढते आणि कष्टांपासून सुटका मिळतो.

कालसर्प दोष दूर करण्याची क्षमता देखील मोरपंखात असते. जे लोक कालसर्प दोषाने पीडित असतील त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीच्या खोळीत 7 मोरपंख ठेवून झोपताना त्याच उशीचा वापर करावा. बेडरूमच्या पश्चिमेकडील भीतींवर 11 मोर पंखांनी तयार केलेला पंखा लावावा त्याने कालसर्प दोष दूर होतो.

शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी मंगळवार किंवा शनिवारी रात्री मोर पंखावर मारुतीच्या कपाळाचे शेंदुराने त्याचे नाव लिहून घरातील देव्हाऱ्यात रात्रभर ठेवावे. सकाळी अंघोळ करण्याअगोदर त्या पंखाला वाहत्या पाण्यात वाहून द्यावे. शत्रू मित्रासारखा व्यवहार करायला लागतो.