शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:19 IST)

जर आपल्या घरातही असे होत असेल तर वेळीच सावध व्हा

आपल्या ज्योतिष शास्त्रात वैदिक गणिताबरोबरच भविष्याचा अनेक शैली आहेत. जसे की शुभ- अशुभ संकेत, विज्ञान, शिंक येणं आणि आवाजाचं संचलन इत्यादी. असेच काही संकेत आपल्याला आपल्या आयुष्यात मिळतात ज्यामुळे आपण हे ठरवतो की आपल्या बरोबर काय होणार ? असेच काही संकेत आपल्या बरोबर शुभ अशुभ होण्याचे संकेत देतात चला जाणून घेऊया.
 
* जर एखादी वस्तू घरात आणल्या बरोबरच तुटून जाते किंवा खराब होते तेव्हा समजावं की भाग्य आपल्याला साथ देत नाही.
* स्वयंपाकघरात पुन्हा पुन्हा दूध उतू गेल्यास किंवा तेल, तूप सांडल्यावर समजावं की भाग्य आपल्याला साथ देत नाही.
* पूजा करीत असताना कुत्र्यांची भुंकण्याची आवाज किंवा भांडण्याची आवाज येतं असल्यास हे देखील शुभ संकेत नाही.
* घरात कोळीचे जाळं लागले असल्यास आणि देवघर नेहमी घाण राहत असल्यास हे शुभ संकेत नाही.
* पूजा करताना दिव्यात तेल किंवा तूप असल्यास आणि वारा नसल्यास एकाएकी दिवा विझल्याचे संकेत देखील चांगले नसतात
* नवे कापडं घातल्यावर एकाएकी ते फाटल्यावर किंवा कुठे अडकणे देखील शुभ संकेत नाही.
* घरातून बाहेर पडताना पायाला ठेच लागणं, चप्पल तुटणं, जोडे फाटल्यास हे शुभ संकेत नाही.
* घराचे मुख्य दार किंवा छप्पर नेहमीच घाण असल्यास किंवा गच्चीवर अडगळ साठवून ठेवलेली असल्यास राहू कुपीत होऊन अप्रसन्न होतात.
* नवरात्रात जी जवाची पेरणी केली जाते जर सर्व जव एकत्र होऊन सोनेरी रंगाचे आल्यास नशिबाची साथ मिळते पण जव पूर्णपणे आले नसल्यास किंवा चार पाच दिवसानंतर निघत असल्यास नशिबात अडथळा येतं आहे असं समजावं.
* पैशांना थुंक लावून मोजणं लक्ष्मीच्या हानीचे सूचक असतं.
* पलंगावर एकाएकी ढेकणं झाले असल्यास समजावं की दुर्दैव दार ठोठावणार आहे.
* रात्रीच्या काळी स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवली असल्यास, त्यांची स्वच्छता केली नसल्यास किंवा वस्तू इथे तिथे पसरलेल्या असल्यास दुर्दैव दार ठोठावतं.
* ज्या घरात नेहमी घाण असते, एखाद्या कोपऱ्यातून घाण वास येतं असल्यास, भिंतीमधून पापुत्रे निघत असल्यास, भिंती मधून ओलावा येतं असल्यास हे देखील चांगले संकेत नाही.