बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (16:28 IST)

Vivah Yog 2020: या 6 राशींच्या लोकांच्या पत्रिकेत जुळून येत आहे विवाह योग

वैदिक ज्योतिषात, कुंडलीच्या सातव्या घरातून वैवाहिक जीवन पाहिले जाते. या भावाने हे माहिती करू शकतो की जातकाचा विवाह केव्हा होईल. शुक्र व राहू हे वरच्या कुंडलीत लग्नाचे घटक मानले जात आहेत तर कन्या कुंडलीत गुरु (बृहस्पती) विवाहाचे घटक आहेत. 
 
वर्ष 2020 मध्ये जन्मकुंडलीत असा बनेल विवाह योग  
जर आपण वर्ष 2020 मध्ये लग्नायोग्य असाल आणि आपल्या कुंडलीतील सातवे घर शुभ स्थितीत असेल तर आपल्या लग्नाची शक्यता प्रबळ आहे. याशिवाय सातव्या घराचा स्वामी शुभ अवस्थेत असेल. त्या भावात कुठल्याही अशुभ ग्रहाची दृष्टी नसेल तर यावर्षी अशा लोकांच्या लग्नाची शक्यताही   आहे.  
 
या राशीच्या लोकांच्या विवाहाचे योग आहे 
यावर्षी मेष राशीच्या लोकांचा विवाह होण्याची पूर्ण शक्यता आहे. एखादे चांगले संबंध येऊ शकतात. म्हणजेच सन 2020 मध्ये आपण विवाहित जीवनात अडकण्याची दाट शक्यता आहे. सन 2020 मध्ये, मिथुन राशीच्या लोकांचा विवाह देखील होऊ शकतो. ग्रह नक्षत्र हे दर्शवित आहेत. जर सिंह राशीचे लोक विवाह योग्य असतील आणि विवाह बंधनात अडकण्याची इच्छा बाळगत असतील तर यावर्षी त्यांची ही इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते.
 
तसेच वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरी देखील शहनाई वाजविली जाऊ शकते. त्यासोबतच धनू आणि कुंभ  राशीच्या लग्नायोग्य लोकांचे लग्नाचे योग बनत आहे. पण ज्या राशीच्या लोकांचे येथे उल्लेख नाही, याचा अर्थ असा नाही की 2020 मध्ये त्या लोकांचे लग्न होणार नाही. वास्तविक, नवीन वर्षात, वरील राशीच्या लोकांच्या लग्नाचे प्रबळ योग आहे.