1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (09:27 IST)

घरात लाल मुंग्या असण्याचे तोटे आणि फायदे, घालविण्याचे उपाय

मुंग्या मुळात दोन रंगाच्या असतात. काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात, पण लाल नाही. लाल मुंग्या अशुभ का मानल्या गेल्या आहेत यामागील कारण जाणून घेतलं पाहिजे. 
 
5 शुभ आणि अशुभ समजूत

घरात होणारे तोटे -
1 लाल मुंग्यांबद्दल असे म्हणतात की घरात यांची संख्या वाढल्यावर कर्ज देखील वाढतं.
 
2 असे ही मानले जाते की ते घरात असणे म्हणजे नजीकच्या काळात संकटे उद्भवणार आहे. म्हणजे असे की जर एखाद्या घरात काही मुंग्या एकत्र दिसत असल्यास असे म्हणतात की त्या घरात काही अघटित घडणार आहे.
 
3 लाल मुंग्या घरात असल्यास घरातील झाडे, अन्न, सुके मेवे, टाईल्स इत्यादींना नुकसान होतं.
 
4 लाल मुंग्या चावतात. त्यांच्या चावल्याने ती जागा लाल पुळी होते आणि त्यावर बऱ्याच वेळ खाज येते. 
 
फायदे -
1 लाल मुंग्याची ओळ तोंडात अंडी घेऊन जाताना दिसणे शुभ असतं. संपूर्ण दिवस शुभ आणि आनंदी असतं.
 
2 जे मुंग्यांना पीठ घालतात आणि लहान चिमण्यांना तांदूळ देतात, ते वैकुंठात जातात.
 
3 कर्जबाजारी लोकांनी मुंग्यांना साखर आणि पीठ द्यावं. असे केल्यानं कर्जापासून सुटका होते.
 
4 मुंग्यांना साखर मिसळून पीठ दिल्यानं माणूस सर्व बंधनांपासून आणि संकटातून मुक्त होतं.
 
5 जर बऱ्याच मुंग्या एकाच ओळीत जात असतील तर हे जोरात पाऊस येण्याचे लक्षण आहे. यासह हे चांगले पीक असल्याचे देखील सूचक आहेत. 
 
मुंग्यांना मारल्यामुळे पाप लागतो -
मुंग्यांना मारण्याच्या औषधाने लोकांना पाप लागतो. हजारो मुंग्यांना मारल्याचा दोष देखील त्यांना लागतो. याचा अर्थ असा आहे की एका समस्येतून सुटका झाल्यास दुसऱ्या समस्येत अडकणं. म्हणजे लाल मुंग्यांना मारण्यात काळ्या देखील मारल्या जातात. अश्या वेळी आपण काय करणार?
 
लाल मुंग्यांना घालविण्याचे उपाय -
लाल मुंग्यांना औषधाने मारू नका, परंतु एक सोपीशी पद्धत अवलंब करा. आपल्या घरात लिंबू असणारच त्याचे साल काढून त्याचे काप करून त्यांना लाल मुंग्या असलेल्या जागी ठेवा. काहीच वेळात मुंग्या पळून निघतील. 
दुसरे उपाय म्हणून आपण तेजपानाचे तुकडे देखील टाकू शकता. त्याच प्रमाणे लवंग आणि काळीमिरी देखील वापरू शकता.