गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

Aspartame तुमच्या कोल्ड्रिंकमधल्या या घटकामुळे कॅन्सर होतो का? डाएट पेयं पिणाऱ्यांनी इकडे लक्ष द्या!

Aspartame Sweetener
- जेम्स गॅलाघर
Aspartame अस्पार्टेम हे स्वीटनर अनेक पदार्थांमध्ये आणि अनेक फेसाळ पेयांत असतं. हे स्वीटनर कर्करोगाचं कारण ठरू शकेल (possibly carcinogenic) अशा पदार्थांत त्यांचा समावेश होणार आहे, असं काही अहवालांत आलं आहे.
 
possibly carcinogenic हा वर्ग नेहमीच गोंधळात टाकत आला आहे कारण त्यामुळे माणसाला असणारा संभाव्य धोका लहान असेल की गंभीर हे कधीच लक्षात येत नाही.
 
possibly carcinogenic मध्ये कोरफड, डिझेल आणि आशियाई भाज्यांची लोणची किंवा मुरवलेल्या भाज्यांचा समावेश केला जातो.
 
एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर याबाबत 14 जुलै रोजी घोषणा करणार आहे.
 
अस्पार्टेम काय आहे?
अस्पार्टेम हे साखरेपेक्षा 200 पट गोड असतं. पदार्थात कोणत्याही कॅलरीविना ते गोड चव देतं.
 
डाएट ड्रिंक सह अनेक शुगर फ्री पदार्थांच्या घटकयादीत तुम्हाला त्याचं नाव दिसेल. अगदी च्युइंगगम आणि योगर्ट्समध्येही. डाएटकोक, कोक झिरो, पेप्सी मॅक्स, 7अप फ्री यासारख्या पेयांसह सुमारे 6000 उत्पादनांमध्ये ते वापरलेलं दिसतं.
 
स्वीटनर म्हणजे पदार्थांना गोडवा आणणारा हा घटक अनेक दशकं पदार्थांत वापरला गेलाय आणि अनेक अन्नसुरक्षा मंडळांनी त्याला प्रमाणितही केलं होतं. पण या घटकावर अनेक वादही निर्माण झाले आहेत.
 
जागतिक आरोग्य संघटनेची कर्करोग संशोधन शाखा आयएआरसी ही अस्पार्टेम आणि कर्करोग यांच्यावर झालेल्या 1300 अभ्यासांचा आढावा घेत आहे.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने त्यांच्या सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत या घटकाला possibly carcinogenic गटात टाकलं जाणार आहे असं म्हटलंय. पण या वर्गात जाणं म्हणजे नक्की काय? होणार याची माहिती घेणं आवश्यक आहे.
 
आयएआरसी आणि फुड अॅडिटिव्हस वर स्थापन केलेली स्वतंत्र तज्ज्ञ समिती याचा अहवाल 14 जुलै रोजी प्रसिद्ध करणार असून लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्येही ते प्रसिद्ध होणार आहे. (फूड अॅडिटिव्हस म्हणजे पदार्थाची रुची वाढवण्यासाठी त्यात मिसळले जाणारे घटक)
 
आयएआरसी 4 संभाव्य शक्यतांचा वापर करतं
 
गट 1 - मानवासाठी कर्करोगजन्य पदार्थ
 
गट 2ए- माणसासाठी जवळपास निश्चितच कर्करोगजन्य ठरू शकते असा पदार्थ
 
गट 2बी- माणसासाठी कदाचित कर्करोगजन्य ठरेल असा पदार्थ
 
गट 3- वर्गीकृत न करता येण्यासारखा पदार्थ
 
पण इथेच गोंधळ वाढतो
 
ओपन विद्यापिठातील संख्याशास्त्राचे प्राध्यापक केव्हिन मॅककॉन्वे सांगतात, आयएआरसीने केलेले वर्गीकरण आपल्याला अस्पार्टेम किती धोकादायक आहे हे नक्की सांगत नाही. कारण आयएआरसीचं वर्गीकरण त्यासाठी नसतंच.
 
आयएआरसी आपल्याला या घटकाबद्दल किती सबळ पुरावे आहेत हे सांगतं, परंतु तो घटक तुमच्या आरोग्यासाठी कसा धोकादायक आहे हे सांगत नाही.
 
possibly गट म्हणजे माणूस आणि प्राण्यांवर केलेल्या प्रयोगाचा मर्यादित अभ्यास उपलब्ध असणारे घटक. त्यात डिझेल, पेरिनियम, निकेल, अलोव्हेरा, मुरवलेल्या आशियाई भाज्या आणि रसायनिक घटक सामावणारे पदार्थ यांचा समावेश होतो.
 
प्रा. केव्हिन सांगतात, या घटकांत कर्करोगजन्य गोष्टी असल्याचे फारसे सबळ पुरावे नाहीत. अन्यथा हे घटक गट 1 किंवा 2एमध्ये टाकले गेले असते.
 
आयएआरसीच्या वर्गीकरणाने गेली अनेक वर्षे असा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि यामुळे विनाकारण धोक्याची घंटा वाजल्यासारखं वाटतं अशी टीका त्यावर होते.
 
जेव्हा रेड मिट म्हणजे लाल मांसाला कर्करोगजन्य म्हणून वर्गीकृत केलं गेलं तेव्हा त्याची बरोबरी धुम्रपानाबरोबर केली गेली. पण 100 लोकांना त्यांच्या रोजच्या आहाराबरोबर 50 ग्रॅम बेकन आयुष्यभर खायला दिलं तरी त्यात एखाद्यालाच कर्करोग होण्याची शक्यता दिसून येते.
 
पण अस्पार्टेमबद्दल ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. 1981 साली मनुष्याच्या वजनाच्या प्रतिकिलोग्राम 40 ग्रॅम हे योग्य प्रमाण योग्य मानले गेले होते. म्हणजे 60 किलो वजनाच्या मनुष्याला 12 ते 36 डाएटपेयांचे कॅन्सची परवानगी मिळते.
 
द इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ बिवरेज असोसिएशनचे कार्यकारी संचालक केट लोटमन सांगतात, "आरोग्य मंडळांनी अशा प्रकारच्या 'कथित फुटलेल्या माहिती'बाबत अधिक जागरुक राहिलं पाहिजे. यामुळे ग्राहकांची विनाकारण दिशाभूल होऊन शुगरफ्री किंवा लोशुगर पर्यांयांऐवजी ते अधिक साखरेकडे वळतील."
 
युकेच्या फुड स्टँडर्ड एजन्सीचे विज्ञान उपसल्लागार रिक ममफर्ड सांगतात, त्यांची संस्था या अहवालाचा बारकाईने अभ्यास करेल. पण आमच्या मतानुसार या स्वीटनरचा आजवर अनेक शास्त्रसमित्यांंनी अभ्यास केला असून सध्या ठरवलेल्या मर्यादेत ते घेणं सुरक्षित आहे.
 
2000च्या दशकात याचा उंदरांवर प्रयोग करण्यात आला होता त्यात कर्करोगाचा धोका दिसला होता. मात्र इतर प्राण्यांत तसं न आढळल्यामुळे या अभ्यासावर टीका झाली होती.
 
गेल्या वर्षी 1,05,000 लोकांचा अभ्यास करण्यात आला. यात स्वीटनर आजिबात न वापरणारे आणि भरपूर प्रमाणात स्वीटनर वापरणाऱ्या लोकांची तुलना करण्यात आली. अस्पार्टेमसह स्वीटनर वापरणाऱ्यांना कर्करोगाचा जास्त धोका असल्याचं म्हटलं गेलं पण या दोन्ही प्रकारच्या लोकांत जीवनशैली आणि आरोग्यात मोठी तफावत होती.
 
इंटरनॅशनल स्वीटनर्स असोसिएशनचे फ्रान्सीस हंट-वूड सांगतात, "अस्पार्टेम हा एकदम बारकाईने अभ्यासला गेलेल्या घटकांपैकी एक आहे. जगभरातील 90 अन्नसुरक्षा संस्थांनी त्याला सुरक्षित म्हणून घोषित केलेलं आहे."
 
काही लोक सुरक्षित मर्यादेतही अस्पार्टेम अन्नातून घेऊ शकत नाहीत. हे लोक म्हणजे ज्यांना अनुवंशिक कारणांमुळे फेनिलकेटोन्युरिया म्हणजे पीकेयू असतो असे लोक.
 
या लोकांना अस्पार्टेम पचवता येत नाही.