गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (20:30 IST)

हिचकी येणं थांबत नाही, मग हे उपाय अवलंबवा.

Here are some simple steps  for Hiccups
हिचकी कधीही आणि कोणालाही येऊ शकते.पण त्यामागील जे कारणं सांगितले जाते ते काही लोक हसण्यावारी घेतात.कारणं असं म्हणतात की हिचकी येणं म्हणजे कोणी आठवण काढत आहे. पण विज्ञान अशा गोष्टींना नाकारतो.बऱ्याच वेळा हंगामात बदल झाल्यावर किंवा शारीरिक बदल झाल्यावर देखील हिचकी येते. पाणी पिऊन किंवा लक्ष भरकटवून देखील हिचकी थांबत नाही. अशा परिस्थितीत व्यक्ती अस्वस्थ होऊ लागतो.आज आम्ही सांगत आहोत असे  काही सोपे उपाय ज्यांना अवलंबवून हिचकी येणं त्वरित थांबते.
 
* तोंडात बोट घाला-
हे वाचल्यावर काहीस विचित्र वाटेल पण विश्वास ठेवा की हिचकी थांबविण्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे. अचानक हिचकी येत आहे आणि काहीच उपाय सुचत नाही तर आपले बोट तोंडात घाला.ही प्रक्रिया करत असताना जास्त दाब आणू नका. अन्यथा आपल्याला ढास येऊ शकते. हळुवार हे करा आणि त्वरित परिणाम बघा.
 
* गुडघे छातीकडे वाकवा-
हिचकी आल्यावर बसून जा. पाय अशा प्रकारे दुमडा की गुडघे छातीला स्पर्श झाले पाहिजे. असं केल्यानं फुफ्फुसांवर दाब पडून स्नायूंचे आकुंचन दूर होते. काही वेळ अशाच स्थितीमध्ये बसून राहावं आपण बघाल की हिचकी बंद झालेली आहे.
 
* मध खा-
ज्या प्रमाणे लहान मुलांना हिचकी येते तेव्हा त्वरितच त्यांना मधाचे बोट चाटवतात आणि ते पुन्हा खेळू लागतात. त्याच प्रमाणे जर मोठ्यांना हिचकी येत आहे तर त्यांनी देखील मध खावं. हिचकी येत असताना मध खाणं फायदेशीर आहे कारणं अचानकपणे शरीराला मिळणारा मधाचा गोडपणा नसांना संतुलित करतो.   
 
* लिंबू चावा -
जे लोक मद्यपान करतात त्यांना अचानक हिचकी आल्यावर लिंबू खाण्याचा सल्ला दिला जातो. जर आपल्याला देखील हिचकी येत आहे आणि थांबतच नाही तेव्हा लिंबाचा एक चतुर्थांश तुकडा घेऊन थोड्या वेळ तोंडात ठेवा हिचकी लगेच थांबेल आणि आपल्याला आराम मिळेल.