शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)

हिवाळ्यात डोळ्यांच्या संरक्षणासाठी उन्हात सनग्लासेस घाला

हिवाळ्यात ज्या प्रकारे त्वचेची निगा राखणे आवश्यक आहे, त्याच प्रकारे डोळ्यांची काळजी घेणं देखील एक महत्त्वाचा भाग आहे. हिवाळ्यात यूव्ही किरणा त्वचेला नुकसान करण्यासह डोळ्यांना देखील नुकसान देऊ शकतात. म्हणून उन्हात निघताना डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरणे एक चांगला उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊ या की हिवाळ्यात डोळ्यांच्या काळजीसाठी सनग्लासेस वापरणे का आवश्यक आहे.
 
* अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून संरक्षण -
ज्या प्रकारे उन्ह्याळ्यात डोळ्याभोवती त्वचेच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे हिवाळ्यात देखील हानिकारक यूव्ही किरणा डोळ्याभोवती त्वचेला अधिक नुकसान करतात. ज्या मुळे डोळे सुस्त दिसतात. वर्षाच्या या काळात म्हणजे हिवाळ्यात यूव्ही किरण अधिक सक्रिय असतात. जे आपल्या डोळ्यांवर परिणाम करतात. हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचा संपर्क जास्त असतो ज्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. म्हणून हिवाळ्यात सूर्यप्रकाशात निघण्यापूर्वी सनग्लासेस वापरणे चांगला पर्याय आहे. सनग्लासेस 99 टक्के यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांना रोखतात आणि डोळ्यांचे संरक्षण करतात.   
 
* विंड बॅरियर म्हणून कामी येतात- 
हिवाळ्यात हवेत धूळ,आणि मातीच्या कणांमुळे कॉर्नियल घर्षण होऊ शकते. सनग्लासेस वायूत अडथळा म्हणून काम करत आणि हवेच्या कणांना डोळ्यात प्रवेश करण्यापासून रोखतो. क्लोज -फिटिंग, सनग्लासेस या घटकांना प्रतिबंधित करण्यासाठी विशेषतः प्रभावी आहेत. काही सनग्लासेस विशेष हायड्रोफोबिक लेपित लेन्ससह येतात जे धूळ, पाणी आणि तेल दूर करतात, ज्यामुळे डोळे सुरक्षित असतात आणि दृष्टी स्पष्ट होते.
 
* डोळ्यांच्या आजारापासून संरक्षण- 
चांगल्या प्रतीचे सनग्लासेस घालणे डोळ्याच्या अनेक आजारांपासून संरक्षण करते. डोळ्याचे बरेच रोग आहेत जे सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे उद्भवू शकतात. डोळ्याचे आजार जसे की मोतीबिंदू, पेंगुइकुला, मॅक्युलर डीजेनेरेशन इत्यादी डोळ्याचे आजार सूर्याच्या थेट आणि असुरक्षित संपर्कापासून होतो आणि त्याचा परिणाम पुढे होऊ शकतो. म्हणून हिवाळ्यात सनग्लासेस वापरणे आवश्यक आहे. 
 
* डॉक्टरांचा सल्ला घ्यावा-
नेहमी सनग्लासेसची निवड करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर आपली दृष्टी कमकुवत आहे तर यासाठी आवश्यक आहे की आपल्या डोळ्यांच्या सामर्थ्यानुसार सनग्लासेस वापरा. असे सनग्लासेस निवडा जे आपल्या डोळ्यासाठी अनुकूल आहे. असे सनग्लासेस निवडा जे 99 ते 100 टक्के यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांना अवरुद्ध करतात. रॅप अराउंड ग्लासेस आपल्या डोळ्यांना बाजूने वाचवतात. ध्रुवीकृत लेन्स ड्राइव्ह करताना चकाकी कमी करतात. जर आपण कॉन्टॅक्ट लॅन्स वापरता तर काही सनग्लासेस यूव्ही संरक्षण प्रदान करतात. 
म्हणून या सर्व कारणामुळे हिवाळ्यात डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरणे आवश्यक आहे.