लहान मुलांना देखील बद्ध कोष्ठता होऊ शकते
बऱ्याच प्रकारचे आजार आहे ज्यामुळे जवळजवळ प्रत्येक व्यक्ती ग्रसित आहे असाच एक आजार आहे बद्धकोष्ठता. लोकांना असं वाटते की हा आजार केवळ मोठ्यांनाच होतो असं नाही हा त्रास लहान मुलांना देखील उद्भवू शकतो. मोठ्यांची लक्षणे दिसून येतात पण लहान मुलं त्या लक्षणांना ओळखू शकत नाही. चला तर मग ह्याचे कारणे, लक्षणे आणि उपचारा विषयी जाणून घेऊ या.
बद्धकोष्ठता म्हणजे काय ?
सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हा बद्धकोष्ठतेचा आजार नेमका काय ? कारण कोणत्या ही आजारापूर्वी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हा आजार आहे तरी काय ? जेव्हा मुलांच्या आतड्यांमध्ये द्रव पदार्थ शोषण्यास बराच वेळ लागतो तेव्हा तो मल किंवा विष्ठाकोरडी होऊन जमून बसते आणि कडक होते. अशा परिस्थितीत मुलांना विष्ठा काढण्यास खूप त्रास होतो. या मुळे विष्ठा कमी निघते. विष्ठा काढताना होणार त्रास आणि विष्ठा कमी येणं ह्यालाच बद्धकोष्ठता म्हणतात. हा त्रास कोणत्याही मुलाला होऊ शकतो.
लक्षणे-
ह्याची लक्षणे आहे जोर लावून कडक आणि कोरडी विष्ठा निघणे, विष्ठा काढताना पोटात वेदना होणं,पोटात गॅस होणं, पायात वेदना होणं, अपचन होणं, अशक्तपणा जाणवणे, डोकं दुखणे, पोटात जडपणा जाणवणे सारखे लक्षणे समाविष्ट आहे. जर आपल्या मुलांमध्ये देखील असे काही लक्षणे दिसत असल्यास काळजी घ्यावी.
कारणे जाणून घेऊ या-
बद्धकोष्ठतेचे कारण जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की आपल्या मुलांना हा त्रास कशा मुळे होत आहे. ह्याच्या कारणांविषयी जाणून घेतले तर ह्याच्या वर उपचार करणे सोपे होईल. मुलांमध्ये ही समस्या उद्भवते. कारण जेव्हा मुलं एखाद्या आजाराने ग्रसित होतो आणि खाणं पिणं व्यवस्थित होत नाही, बाळाला आईच्या दुधासह वरचे दूध दिले जाते किंवा जेवताना कोरडे खाणं, मुलांना डेयरीच दूध किंवा त्यापासून बनलेल्या पदार्थांमुळे देखील बद्धकोष्ठता होऊ शकते,किंवा शरीरात पाण्याची कमतरता आहे आणि काही औषधे घेतल्यावर देखील बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवू शकतो.
हे टाळण्याचे उपाय-
हा त्रास टाळण्यासाठी आपण दररोज मुलांना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे मध मिसळून देऊ शकता. ह्याचे नियमित सेवन केल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. या व्यतिरिक्त आपण हा त्रास दूर करण्यासाठी एक ग्लास दुधात 1 ते 2 चमचे मध आणि साखर घालून देऊ शकता या शिवाय थोडे अंजीर उकळवून एक ग्लास दुधात घालून रात्री झोपण्यापूर्वी मुलाला पाजून द्या. या मुळे देखील बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यात मदत मिळते. एवढेच नव्हे तर एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून पाजल्याने मुलांचा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.