1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

खरच 32 वेळेस एक घास चावून खाल्ल्यास आरोग्याला मिळतात का फायदे? जाणून घ्या

thali
आपण नेहमी वयस्कर व्यक्तींकडून ऐकत आलो आहोत की, जेवण करतांना घास नेहमी 32 वेळेस चावून खावा. या मध्ये किती तथ्य आहे चला जाणून घेऊ या. जेव्हा पण पण जेवण करतो त्यावेळेस मोठे व्यक्ती सांगतात की 32 वेळेस चावून खा यामुळे अनेक फायदे मिळतात तर चला जाणून घेऊ या जेवण 32 वेळेस चावून खाण्याचे फायदे. 
 
जेवण चावून खाल्ल्यास मिळतात अनेक फायदे-
पाचन तंत्र सुधारते : जेवण जेवढे अधिक चावून खाल, ते तेवढेच छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बदलते. यामुळे पोटामध्ये पाचन क्रिया सुधारण्यास मदत मिळते. तसेच जेवण चांगल्या प्रकारे पचते.
 
व्हिटॅमिन आणि मिनिरल चांगल्या प्रकारे मिळतात-
जेवण चावून खाल्ल्यामुळे जेवणातील पोषकतत्व अब्सॉर्ब होतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात.
 
वजन नियंत्रणात राहते-
हळू हळू जेवण केल्यास आणि अधिक चावून खाल्ल्यास पोट भरल्याची जाणीव होते. व वजन नियंत्रणात राहते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik