शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (15:27 IST)

म्हणून पायात घालतात पैंजण

महिला, मुलींच्या पायात चांदीचे पैंजण घालणे हा आपल्या परंपरागत सोळा श्रृंगारांचा एक भाग प्राचीन काळापासून मानला गेला आहे. मात्र या मागे नुसते पायाचे सौंदर्य वाढविणे हा हेतू नाही तर महिलांचे आरोग्य चांगले राहावे हा त्यामागचा मूळ हेतू आहे. पैंजण घालण्यामागे पैंजणाच्या आवाजामुळे घरातील नकारात्क ऊर्जा बाहेर जाते असे धार्मिक कारण दिले जाते. मात्र त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. चांदी आणि सोने या धातूंचा वापर आरोग्यासाठी फार प्राचीनकाळापासून केला जात आहे. चांदीच्या वापरामुळे महिलांच्या हार्मोन बदलामुळे येणार्‍या अनेक अडचणी दूर होतात. चांदीचे पैंजण पायात घातले की चांदी पायाच्या त्वचेवर घासली जाते आणि त्यातून या धातूचे गुण शरीरात जातात. पायावर येणारी सूज, गुडघेदुखी, टाचादुखी आणि हिस्टेरिया सारख्या व्याधीतून यामुळे आराम‍ मिळतो. चांदीच्या वापरामुळे शरीरात रक्तप्रवाह सुरळीत राहतो, सूज कमी होते, शरीरातील ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील ग्रंथी सक्रिय राहतात.
 
आणि स्त्रीरोगसंबंधी अडचणी दूर होतात. प्रसूतीदरम्यान येणार्‍या अडचणी दूर होतात तसेच पाय दुखणे, मुंग्या येणे, पायातील शक्ती कमी होणे या सारख्या व्याधीमध्येही चांदीचे पैंजण घालण्याने फायदा होतो.