गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

काय आहे हे मिसिंग टाइल सिंड्रोम

मिसिंग टाइल सिंड्रोम एक मनोवैज्ञानिक समस्या आहे ज्यात कसली तरी उणीव जाणवतं असते. अर्थात आमचं सर्व लक्ष्य आमच्याकडे नसलेल्या गोष्टींकडे किंवा वस्तूकडे लागलेलं असतं. आणि हे आमचं सुख हिरावण्यासाठी पुरेसे आहे. जीवनात कितीही चांगलं घडतं असलं तरी आम्ही त्याकडे बघतो जे मिसिंग आहे आणि हेच दुखी होण्याचे कारणदेखील. 
 
मिसिंग टाइल सिंड्रोम - एकदा एका शहरातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये स्विमिंग पूल तयार केले गेले. पुलाच्या चारी बाजूला उत्तम इटॅलियन टाइल्स लावण्यात आल्या परंतू एका स्थानावर टाइल लावणे राहून गेले. आता प्रत्येकाची नजर टाइल्सची सुंदरतेकडे जायची, त्याची सुंदरता बघून लोकं खूशदेखील व्हायचे परंतू जशीच त्यांची नजर मिसिंग टाइलकडे जात असे त्यांची नजर तिथेच टिकून राहायची. नंतर व्यक्ती कोणत्याही इतर टाइलच्या सुंदरतेकडे लक्ष देऊ पात नसे. 
 
पुलावरून परतल्यावर प्रत्येकाची ही तक्रार असायची की एक टाइल मिसिंग आहे. हजारो सुंदर टाइल्स असल्यावरही ती मिसिंग टाइल प्रत्येकाच्या मेंदूवर हावी असायची. अनेका लोकांनी दुःख प्रकट केले की इतर परर्फेक्ट काम असून केवळ एका टाइलमुळे सर्व विस्कटतंय. काही तर त्याला दुरुस्त करायची सल्ला देत असे. एकूण तिथून कोणीही खूश निघालं नाही आणि एक सुंदर स्विमिंग पूल देखील लोकांना आनंद देऊ शकलं नाही. 
 
खरं तर त्या पुलामध्ये ती मिसिंग टाइल एक प्रयोग होता. मनोवैज्ञानिक प्रयोग हे सिद्ध करतं की आमचं लक्ष्य नेहमी ज्या गोष्टीची कमी असते तिकडेच असतं. सर्व कितीही सुंदर असलं तरी एका कमीकडे आमचं पूर्ण लक्ष लागलेलं असतं. ही तर गोष्ट केवळ टाइलच होती परंतू जीवनात ही असंच घडतं असतं... ही प्रत्येक माणसाला असणारी एक मनोवैज्ञानिक समस्या आहे. या मानसशास्त्र समस्येला मिसिंग टाइल सिंड्रोम नाव दिले गेले.
 
आमच्यातून कोणीच परिपूर्ण नाही. प्रत्येकात कमी आहे आणि त्यांचा जीवनाप्रती दृष्टिकोन हे ठरवतं की दोष कसे दूर करावे. यासाठी काही विचार करण्यासारख्या गोष्टी:
 
लालच
प्राप्त करण्याचा लोभ कधीच संतुष्ट राहू देत नाही. स्वत:वर लोभ हावी होऊ दिला नाही तर सर्व नियंत्रित राहू शकतं.
 
सकारात्मक विचार
नकारात्मक गोष्टी किंवा आपल्याला जीवनात न मिळालेल्या वस्तूंवर दुखी होण्यापेक्षा कसे यातून बाहेर पडू शकतो त्यावर विचार करावा. इतरांशी स्वत:ची तुलना करणे योग्य नाही. स्वत:च्या परिस्थितीत आनंदी कसे राहावे याचा प्रयत्न करावा.
 
संतुष्ट
संतुष्ट असणे सर्वात सकारात्मक स्थिती आहे. संतुष्ट असल्यास जीवनातील लहान सुखाचे क्षणदेखील मोठा आनंद देऊन जातात. संतुष्ट नसल्यास आपल्याकडे सर्व असलं तरी आपण दुखीच राहाल.