रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (18:09 IST)

कोविडच्या रुग्णांमध्ये रक्त साकळण्याचा धोका का आहे ? जाणून घ्या

कोरोना विषाणूच्यासाथीच्या रोगाने माणसांना वाईट रीतीने गिळले आहे.ज्या लोकांनी या आजारावर मात देऊन ही लढा जिंकली आहे.त्यांना इतर रोग होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना मधुमेहाचा आजार नव्हता,ते देखील बरे झाल्यावर मधुमेहाच्या आजाराच्या विळख्यात अडकत आहे. हा आजार रोखण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्याचा प्रादुर्भाव अजूनही सुरू आहे. आता कोविडपासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये रक्त साकळण्याचा आजार समोर येत आहे. ज्याला रक्त गोठणे ,ब्लड क्लाटिंग किंवा थम्ब्रोसिस असे म्हणतात. 
 
काय आहे हा आजार आणि कसा होतो ?
तज्ञ आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू शरीरात शिरल्यानंतर सूज येणे सुरू होते. ज्यामुळे हृदय कमकुवत होऊ लागते. त्याचा थेट परिणाम हृदयाचा ठोकाच्या गतीवर होतो आणि हळूहळू शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. याला रक्त गोठणे किंवा साकळणे म्हणतात.रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे, हृदय खूप कमकुवत होतो आणि तो त्याच्या क्षमतेनुसार कार्य करण्यास असमर्थ होतो .या मुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
 
कोविड रूग्णांमध्ये रक्त का साकळत आहे? 
जागतिक स्तरावर संशोधन केले गेले आहे ज्यामध्ये कोविडमधील 15 ते 30 टक्के रुग्णांना या आजाराचा धोका असल्याचे समोर आले आहे. याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणतात. तज्ञांच्या मते, हा विषाणू रक्तासह फुफ्फुसांशी देखील निगडित आहे .
 
रक्ताच्या गुठळ्या कोठे तयार होतात ?
कोविडवर सतत संशोधनानंतर इतर रोगांवर संशोधन सुरु आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की कोविड रूग्णांपैकी जवळजवळ 30 टक्के लोकांमध्ये ही समस्या उद्भवत आहे. रक्त पेशी संपूर्ण शरीरात असतात त्यामुळे रक्त गुठळ्या कोठेही तयार होऊ शकतात.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोविड च्या आजारा नंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका सामान्यपेक्षा 100 पटीने जास्त असतो.