रविवार, 23 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

पावसाळ्यात खात आहात का हिरव्या भाज्या? तर या प्रकारे करा उपयोग

Why should you avoid eating green vegetables during monsoons
पावसाळा सुरु झाला आहे या दरम्यान डायरिया, फूड पॉइजनिंग, फ्लू व इंफेक्शन चा धोका मोठ्या प्रमाणात असतो. याकरिता योग्य खान-पान आणि चांगली डाएट घेणे गरजेचे असते. पण यादरम्यान कच्च्या भाज्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. चला जाणून घेऊ या.
 
का खाऊ नये हिरव्या भाज्या?
या वातावरणामध्ये हिरव्या भाज्यांच्या पानांवर बॅक्टीरिया जमा झालेला असतो. ज्यामुळे पोटदुखी, इंफेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे पावसाळ्यात पालक, बथुआ, मेथी, फुलकोबी, पत्ता कोबी ह्या भाज्या खाणे टाळले जाते.
 
1. ताज्या भाज्या आणि सलाड आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण पावसाळ्यात या शक्यतो खाऊ नये. पावसाळ्यात या भाज्यांच्या पानांवर कीटाणु व बॅक्टेरिया असतात. जास्त करून भाज्या या जमिनीच्या आतमध्ये उगवल्या जातात. अधिक ओलाव्यामुळे यांमध्ये जर्म्स, बॅक्टीरिया आणि वायरस निर्माण होतात. 
 
2. अश्यावेळेस जर तुम्ही या भाज्या स्वच्छ धुवून खाल्ल्यानंतर आजार वाढू शकतात. आजार पसरविणारे हे  सूक्ष्मजीव डोळ्यांनी दिसत नाही.  
 
3. तसेच शेतांमध्ये शेतकरी कीटनाशक औषध, पेस्टिसाइड्स आदी शिंपडतात, ज्यामुळे भाज्यांवर त्यांच्या प्रभाव पडतो. जर वेळेस तुम्ही या भाज्या न धुता आणि कच्च्या खाल्यास आरोग्य बिघडू शकते. 
 
काय करावे?
1. जर तुम्हाला पावसाळ्यात पाले भाज्या आणि सलाड खायचे असेल तर गरम पाण्याने धुवून उकळवून खाव्या.  
 
2. हिरव्या पाले भाज्या लेटयूस (Lettuce), पालक, पत्ताकोबी, मुळा हे शक्यतो खाणे टाळावे. कारण यांमध्ये बॅक्टेरिया पसरविणारे अंडे असतात. जे तुम्हाला आजारी करू शकतात.
 
3.या भाज्या गरम पाण्यामध्ये भिजवून नंतर परत चांगल्या पाण्याने धुवाव्या.
 
हिरव्या भाज्यांसोबत वांगे देखील खाऊ नये कारण यांमध्ये किडे असतात. वांगे खाल्ल्यास पोटात इंफेक्शन होऊ शकते.
 
काय खावे?
आयुर्वेद अनुसार, पावसाळ्यात असे पदार्थ सेवन करावे जे लागलीच पचातील. श्रावणात तुम्ही डाळी, तुरई, टोमॅटो, बटाटा, भोपळा, दुधी, नट्स, बीन्स, फळे, मखाने, शिंगाड्याच्या आटा, साबुदाणा, केळे, डाळींब, नाशपति आणि जांभूळ खाऊ शकतात. तसेच पावसाळ्यात सात्विक जेवण करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik