शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मे 2020 (22:27 IST)

कैरी: उन्हाळ्यात घ्या बहुमूल्य लाभ

उन्हाळा आला की कच्च्या आणि पिकलेल्या आंब्यांची भरपूर आवक होते. या दोघांचे आपापले फायदे आहेत. उन्हाळ्यात कच्च्या आंबा ज्याला आपण कैरी म्हणतो त्या पासून चटणी, पन्हे, लोणची, बनवले जातात. हे चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतं. कैरीचे 7 उत्तम फायदे जाणून घ्या
 
1 कैरी फक्त अन्नाला चविष्टच बनवत नाही तर निरोगी राहण्याची मदत करते. रक्त विकार टाळण्यासाठी कैरीचे सेवन केले पाहिजे.
 
2 जर आपल्याला ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, अपच या सारखे त्रास होत असतील तर कैरीचे सेवन करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या सर्व तक्रारी आणि विकारांवर हे फायदेशीर आहे.
 
3 उलटी होणे किंवा जीव घाबरणे असा त्रास होत असल्यास कैरी आणि पादेलोण घेतल्याने या त्रासांपासून लगेच आराम होतो. काही वेळातच आपल्याला चांगले वाटू लागते.
 
4 कैरीचे नियमित सेवन केल्याने आपले केस काळेभोर राहतात तसेच आपली त्वचा तजेलदार आणि मऊ होऊन त्वचा टवटवीत राहते.
 
5 मधुमेह असल्यास याचे सेवन केल्याने आपल्या शरीरामधील साखरेच्या पातळीला कमी करण्यास मदत मिळते. कैरीचे सेवन करून आपण शरीरामधील लोह (आयरन) पुरवठा पूर्ण करू शकता.
 
6 यात भरपूर प्रमाणात  व्हिटॅमिन सी आढळतं ज्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत मिळते सोबतच सौंदर्याची काळजी सुद्धा घेतली जाते. याचे सेवन डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहेत.
 
7 आपल्याला जास्त प्रमाणात घाम येत असल्यास तर कैरीचे पन्हे किंवा कैरीचे सेवन केल्यास या त्रासापासून आराम मिळतो.