शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (13:07 IST)

800 रुपये किलो विकली जाणारी लाल भेंडीचे फायदे जाणून व्हाल हैराण

benefits of red okra
आतापर्यंत तुम्ही बहुधा हिरव्या रंगाची भेंडी पाहिली असेल. परंतु मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील मिश्रीलाल राजपूत या शेतकऱ्याने आपल्या शेतात लाल भेंडी उगवली आहे. ही भिंडी हिरव्या भेंडीपेक्षा खूप वेगळी आहे. याचा केवळ रंगच वेगळा नाही, तर त्याची किंमत आणि पौष्टिक मूल्य देखील हिरव्या भेंडीच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे. शेतकरी मिश्रीलाल यांनी सांगितले की लाल भिंडी मॉलमध्ये सुमारे 700-800 रुपये प्रति किलो विकले जाईल. लाल भेंडी सामान्य भेंडीपेक्षा कित्येक पटीने महाग विकली जात आहे.
 
या रोगांवर फायदेशीर
लाल भेंडीचे अनेक फायदे असल्याचा शेतकरी दावा करत असून जाणून घ्या याचे फायदे-
 
1- शेतकऱ्याचा दावा आहे की लाल भेंडीच्या सेवनाने हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.
2- लाल भेंडीच्या सेवनामुळे रक्तदाब, मधुमेहाची कोणतीही समस्या नसल्याचा दावा केला जातो.
3- उच्च कोलेस्टेरॉल ग्रस्त लोकांसाठी लाल भेंडीचे सेवन फायदेशीर असल्याचे म्हटले गेले आहे.
4- अँथोसायनिन्स मुळे महिलांच्या त्वचेसाठी आणि मुलांच्या मानसिक विकासासाठी लाल भेंडी फायदेशीर असल्याचे म्हटले गेले आहे.
5- डास, सुरवंट, किडे लाल भेंडीमध्ये दिसत नाहीत. यामुळे पिकाचे नुकसान होत नाही.
 
इतर फायदे
लाला भेंडीमध्ये फोलेट नावाचे पोषक तत्व असते, जे गर्भाच्या मेंदूच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावते. आपण भेंडीच्या सहाय्याने कर्करोग दूर करू शकता. भिंडी विशेषतः कोलन (आतडे) कर्करोग काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आतड्यांमध्ये असलेले विषारी पदार्थ काढून टाकते.
 
भेंडीमध्ये असलेले पेक्टिन कोलेस्टेरॉल कमी करते. त्यात आढळणारे विद्रव्य फायबर रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करते. यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. भेंडीत आढळणारे युजेनॉल मधुमेह कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते.