गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (10:16 IST)

सुदृढ आरोग्यासाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यामध्ये खाऊ घाला

Feed children in silverware for good health Marathi Health Tips in Marathi Webdunia Marathi
आपल्या हिंदू धर्मात चांदीला अतिशय शुभ आणि पवित्र मानले आहे.आधीच्या काळात लोक चांदीच्या ताटात किंवा केळीच्या पानावर जेवण करत असे.त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले असायचे.चांदीच्या पात्रात जेवण केल्याने शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर होतात. स्त्रियांचे अनेक व्याधी दूर करण्याचे कार्य चांदी करते.चांदी मुळात थंड प्रकृतीची असते.म्हणूनच चांदीचे वैशिष्ट्य दागिने भारतीय स्त्रिया घालतात.पूजेत देखील चांदीच्या पात्रांचा महत्त्व आहे आणि ते उपयोग केले जातात.
 
बाळाच्या जन्माच्या 6 महिन्यानंतर त्याला चांदीच्या ताटात जेवू घातले जाते. चांदीच्या ग्लासाने पाणी पाजलं जाते. मामाच्या हातून बाळाचं उष्टावण केलं जातं.या नंतर बाळ ठोस आहार घेऊ शकतात असे म्हटले जाते.पण या मागील काही शास्त्रीय कारण आहे.तसं तर चांदीच्या ताटात किंवा पात्रात प्रत्येकानेच जेवायला हवे.लहान मुलांना दिल्यास त्यांचा शारीरिक,मानसिक विकास चांगला होतो.बाळाला अनेक व्याधी आणि आजारांपासून संरक्षण करता येते. बाळास चांदीत जेवू घातल्याने किंवा पाणी पाजल्याने पोटदुखी,डायरिया,पोटाचे इतर आजारानं पासून रक्षण होते.लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते,आणि अन्य संसर्गा पासून रक्षण होते.
 
आपण चांदीचा वापर करण्याचे फायदे बघू या...
 
1 संसर्गापासून बचाव :
चांदी शुद्ध धातू आहे.ह्यात समाविष्ट अँटी मायक्रोब्रियल शरीरास रोगांपासून रक्षण करते.यामुळे शरीरात कुठलेही संक्रमण होत नाही.
 
2 शरीरास थंड ठेवते:
चांदी थंड धातू असल्याने बाळाच्या आरोग्यास चांगली असते.शरीरातील उष्णतेला कमी करते.त्यामुळे बाळ शांत राहतं,उग्र किंवा तामसी होत नाही.उन्हाळ्यात चांदीचा ताटात जेवू घालावे,आणि चांदीचा ग्लासा मधून पाणी किंवा दूध पाजावे.
 
3 शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती वाढीस होते :
लहान मुलं नाजूक असतात त्यामुळे त्यांची शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमकुवत असते.ते लवकर आजारी पडतात.चांदीचा वापर केल्याने या धातूचे काही अंश जेवणातून शरीरात जातात आणि त्यामुळे मुलांची रोग प्रतिरोधक शक्ती सुदृढ होते आणि मुलं निरोगी राहतात.
 
4 वात- कफाचा त्रास कमी होतो :
सततच्या पित्त दोषांच्या त्रासामुळे लहान मुलांना नेहमीच सर्दी पाडसाच्या त्रास होतो.चांदी वापरल्याने मुलांना या त्रासांपासून मुक्ती मिळते.
 
5 स्मरणशक्तीत वाढ होणे :
जेवणातून चांदीचे कण पोटात गेल्याने मुलांच्या स्मरणशक्तीस वाढण्यास मदत होते आणि ते निरोगी व सुदृढ बनतात. चांदीच्या पात्रात कोणत्याही वयोगटाच्या लोकांनी जेवणे किंवा पाणी पिणे लाभदायक असते. याने शरीरास तेज येते. हे शरीराचे आरोग्यास लाभप्रद असते.