गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Weight Loss by Aloe Vera वजन कमी करण्यासाठी या 3 प्रकारे कोरफडाचं सेवन करा, काही दिवसातच फरक दिसेल

आयुर्वेदानुसार निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आरोग्यासाठी वरदान मानल्या जातात.त्या पैकी एक आहे कोरफड.कोरफडीचा वापर वर्षानुवर्षे केवळ सौंदर्य वृद्धी साठीच होत नाही तर त्याच्या वापरामुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. कोरफडीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक अॅसिड, कोलीन, मॅग्नेशियम, जिंक, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम, आयरन,आणि मॅंगनीज हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर बनवते. कोरफडीच्या मदतीने एखादी व्यक्ती पोटावरील चरबी कमी करून आपले वजन कमी करू शकते. 
कोरफड जेल शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून वजन कमी करण्यास मदत करते. कोरफड वापरून वजन कमी करायचे असेल तर या 3 पद्धती वापरा. 
          
1 लिंबाच्या रसात कोरफड घ्या-
कोरफड सोबत लिंबाचा रस तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करू शकतो. कोरफड आणि लिंबूपासून बनवलेले हे एक उत्तम पेय आहे, जे एकत्र सेवन केल्यास त्याचे फायदे वाढतात. त्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रियाही वेगवान होते.
 
2 कोरफड जेल-
दुसर्‍या पद्धतीत तुम्ही कोरफडची ताजी पाने तोडून त्यातील गर बाहेर काढा. हा गर  रोज सकाळी रिकाम्या पोटी खा. असे केल्याने तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल. 
 
3 जेवणापूर्वी कोरफडीचा रस घ्या-
जेवणापूर्वी कोरफडीचा रस घेतल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. यासाठी जेवणाच्या 20 मिनिटे आधी एक चमचा कोरफडीचा रस घेतल्याने पचनक्रिया चांगली राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे मेटाबॉलिज्मला चालना देण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे शरीरात साठलेली चरबी खूप वेगाने जळू लागते. कोरफडमध्ये व्हिटॅमिन बी ची उपस्थिती शरीरात साठलेल्या चरबीचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम करते. कोरफडीचा रस तुम्ही दोन आठवडे सेवन करू शकता.