शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 3 मार्च 2019 (00:51 IST)

का जरूरी आहे तुमच्या आहारात फायबर, 4 मोठ्या आरोग्याशी निगडित समस्येपासून दूर करतो

आपल्या आहारात फायबर तितकेच महत्त्वाचे आहे जितके प्रोटीन, व्हिटॅमिन किंवा मिनरल. फळ, भाजी, संपूर्ण धान्य आणि डाळींनी आपल्याला फायबर मिळत. भारतीय पाककृतीमध्ये मोसमी फळे, पोळी, भाजी, तूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, राजमा इत्यादीपासून देखील आपल्याला फायबरची प्राप्ती होते. फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास देखील मदत करतो. फक्त इतकेच नव्हे तर आहारात पुरेसे फायबर, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग आणि लठ्ठपणापासून सुद्धा दूर ठेवतो. 
 
* फायबर प्रीबायोटिक आहे. यामुळे कोलनमधील मित्र बॅक्टेरियामध्ये वाढ होते. 
* फायबर हा एक महत्त्वाचा अँटिऑक्सीडेंट आहे.
* डाइटमध्ये घेतलेल्या फायबरमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता कमी होते. 
* रेशेदार आहार घेतल्याने भोजन केल्याचे समाधान मिळत. त्यामुळे पोट बरोबर भरतो. 
 
याच्या उलट काही रेशे नसणारे पदार्थ, जसे मैदा इत्यादी आरोग्यास हानिकारक असतात.