मंगळवार, 5 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (23:10 IST)

फिटनेसचा फंडा

उद्यापासून व्यायाम सुरू करू असं म्हणणार्‍यांचा उद्या कधीच येत नाही. तुम्हीही व्यायाम उद्यावर ढकलताय का?
सकाळी उठून जीममध्ये जाणं तुमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे का? सकाळी मस्त ताणून द्यायची, आराम करायचा असं तुम्हाला वाटत असेल तर लवकर जागे व्हा. सकाळी उठून व्यायामाला सुरूवात करा. ही सवय लावून घेण्यासाठी काय करायचं याविषयी...

* सोशल मीडियावर काही वेळ घालवल्याशिवाय झोप येत नसेल तर तुम्हाला ही सवय बदलायला हवी. सोशल मीडियामुळे तुमचं वजन कमी होणार नाही. मात्र जीममध्ये घाम गाळल्यामुळे तुम्ही नक्कीच फिट व्हाल. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपायला हवं. आठ तासांची शांत झोप घेतल्यानंतर सकाळी ताजंतवानं वाटतं. त्यामुळे दररोज लवकर उठण्याची सवय लावा.
* जीमला जाताना एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला सोबत घ्या.कोणीतरी सोबत असेल तर तुम्हालाही जीमला जाण्यात रस वाटेल. मस्त गप्पा मारत जीममध्ये जाण्याचा आनंद वेगळाच असतो.
* जवळची जीम शोधा. लांबवरच्या जीममध्ये जायचा खूप कंटाळा येतो. अशावेळी जवळच्या जीमचं सदस्यत्व घेतलं तर तुमचा वेळही वाचू शकेल.
* आपल्याला वजन कमी करायचं आहे असा दृढनिश्चय करा. एखाद्या दिवशी आपल्याला खूप कंटाळा येईल. पण हा कंटाळा बाजूला ठेवून व्यायाम करायला जा. कंटाळ्यापेक्षाही व्यायाम जास्त महत्त्वाचा आहे.
* तुमचं वजन एका दिवसात वाढलेलं नाही. तसंच ते पटकन कमीही होणार नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी थोडा वेळ द्या. झटपट निकालांची अपेक्षा करू नका.