Health Care Tips: या चुकांमुळे इम्युनिटी होऊ शकते कमजोर
2020 मध्ये, जेव्हापासून जगात कोरोनाने थैमान घातले आहे, तेव्हापासून सर्वात जास्त चर्चेचा विषय असेल तो रोग प्रतिकारशक्ती. या साथीच्या आजारात लोक स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व उपाय योजना करत आहेत. मजबूत प्रतिकारशक्ती असल्याने अनेक आजारांपासून सुरक्षित राहण्यास मदत होते. पण, नकळत आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. चला तर मग जाणून घेऊया त्या सवयींबद्दल ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते.
7-8 तास झोप न घेणे
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामात इतका व्यस्त असतो की, त्यामुळे त्यांना झोपायलाही वेळ मिळत नाही. पुरेशी झोप न मिळणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. योग्य झोप न मिळाल्यास शरीरात प्रथिने तयार होत नाहीत. त्यामुळे शरीरात अँटीबॉडीज योग्य प्रकारे तयार होत नाहीत. किमान 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
खूप ताण
आजकाल लोकांच्या जीवनात खूप तणाव आहे. शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील चांगले असणे खूप गरजेचे आहे. अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे की जास्त ताणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. चांगली प्रतिकारशक्ती राखण्यासाठी, तणाव आणि चिंता जीवनापासून दूर ठेवा.
निरोगी आहार न घेणे
वेळेच्या कमतरतेमुळे बरेच लोक जंक फूडचे सेवन करतात. हा पदार्थ पटकन तयार होतो आणि चवीलाही छान लागतो. पण, आरोग्याच्या दृष्टीने हे पदार्थ अजिबात चांगले नाही. फळे आणि भाज्यांमध्ये तांबे, बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्वे ए, सी आणि ई सारखे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच शरीरातील चरबी जाळून वजन कमी करण्यासही मदत होते.