दातांची निगा कशी घ्याल

Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (09:35 IST)
व्यक्तीचे सुंदर दात त्याची हसण्यावरून त्याचा परिचय करून देतात. त्याचे दात दिसत असतील तरच तो चारचचौघामध्ये हसू शकतो नाही तर त्याला हसण्यात बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे मोत्यांसारखी मिळालेल्या दातांची आपण योग्य पद्धतीने निगा घेतली पाहिजे. जर त्याकडे आपण दूर्लक्ष केले तर दातांवर काळे डाग पडून त्यास किडा लागू शकते व जेवण करताना दात दुखत असतील किंवा चावण्यास त्रास होत असेल तर तत्काळ दातांच्या डाँक्टरांकडे दाखवून उपचार घेतले पाहिजे.

जेवणानंतर किंवा पदाथर् खाल्ल्यानंतर दातांना चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले पाहिजे. दातांना योग्य वेळी जर स्वच्छ केले नाही तर जिंजीवाइटिस, पीरियोडेंटिस सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जिंजीवाइटिसमध्ये हिरड्यांना सूज येऊन दुखतात व लालबुंद होतात. जिंजीवाइटिसवर योग्य उपचार जर झाला नाही तर पीरियोडेंटिस सारखी धोकेदायक समस्येला सामोरे जावे लागते. हिरड्या व दात यांच्याशी जोडलेला जो भाग असतो तो नष्ट करण्याचे काम पीरियोडेंटिसचे कीटक करीत असतात. त्यामुळे दात खिळखिळे होतात.
या समस्यांपासून सुटण्यासाठी हे करून पाहा :-

* दिवसभरातून दोन वेळा साधारण सकाळी व रात्री जेवणानंतर दात चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले पाहिजे. यासाठी चांगला टूथब्रश वापरला पाहिजे. तीन ते चार महिन्यातून तो बदलवला पाहिजे कारण काही काळानंतर तो खराब होतो व ब्रश करताना हिरड्यांना इजा होते.
* दात स्वच्छ करताना योग्य पद्धत वापरली पाहिजे. टूथब्रश 45 अंशाच्या कोनात दातांवर फिरविला पाहिजे.
* मंजनचा वापर करून देखील दात स्वच्छ होत नसतील तर फ्लोराइड दंत मंजन वापरले पाहिजे.
* जेवणानंतर पाण्याची गुळणी करून दात स्वच्छ केले पाहिजे. त्याने दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण निघून जातात.
* माउथवाशचा देखील प्रयोग आठवड्यातून दोन-तीन वेळा केला पाहिजे. त्याने तोंडाची दुर्गधी येत नाही.
* जेवणानंतर फ्लौसने देखील दातांची पूणॅ स्वच्छता केली पाहिजे. फ्लौस वापरण्याची एक वेगळी पद्धत असते. फ्लौस एक यंत्र असून त्याला एक धागा बांधलेला असतो. तो धागा दातांच्या मध्ये अडकवून दातावर जमा झालेली घाण स्वच्छ करता येते.
* जिंजीवाइटिसचा आजार दूर करण्यासाठी 'क' व 'ड' जीवनसत्त्व तसेच लवंगाचे तेल यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे.
* दातांच्या स्वच्छते करिता खीरा, गाजर, मुळा तसेच सफरचंद चावून चावून खाल्ल्याने फायदा होऊ शकातो.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

UPSC Main Exam Preparation Tips: UPSC मुख्य परीक्षेत यश ...

UPSC Main Exam Preparation Tips: UPSC मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी  कोणत्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत जाणून घ्या
Exam Preparation Strategy: UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षेचे निकाल आधीच ...

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध
भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन, ज्या दिवशी भारत स्वतंत्र ...

Tips for Routine Makeup : रुटीन मेकअप करण्यासाठी टिप्स

Tips for Routine Makeup : रुटीन मेकअप करण्यासाठी टिप्स
मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला ऑफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत ...

Dengue Symptoms डेंग्यूची कारणे ,लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Dengue Symptoms डेंग्यूची कारणे ,लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
डेंग्यू संसर्ग ही जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे .

व्यायाम म्हणजे काय? महिलांसाठी घरकाम हा व्यायामाला पर्याय ...

व्यायाम म्हणजे काय? महिलांसाठी घरकाम हा व्यायामाला पर्याय ठरू शकतो?
शारीरिक हालचालींच्या व्यायामात महिला पुरुषांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचं जागतिक आरोग्य ...