रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (14:49 IST)

शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर या नॅचरल ड्रिंक्‍सने बॉडीला करा डिटॉक्‍स

योग्य खानपान आणि औषधांमुळे तुम्ही शरीरात तयार होणार्‍या यूरिक ऍसिडच्या स्तराला नियंत्रित करू शकता.
 
यूरिक ऍसिडची अधिकता शरीराला बर्‍याच प्रकारे नुकसान पोहोचवते. आम्ही तुम्हाला असे काही नॅचरल ड्रिंक्सबद्दल सांगत आहोत ज्याचे सेवन केल्याने शरीरातील यूरिक अॅसिडचे स्तर कमी होतील आणि तुम्हाला त्याचा योग्य फायदा देखील मिळेल.
नारळ पाणी
यूरिक ऍसिडच्या स्तराला नियंत्रित करण्याचा सर्वात उत्तम उपाय पाणी आहे. पाण्याशिवाय नारळ पाणी देखील यूरिक ऍसिडला नियंत्रित करतो. हे यूरिक ऍसिडला पातळ करून किडनीला उत्तेजित करतात ज्यामुळे शरीरातून यूरिक ऍसिड मूत्राच्या माध्यमाने बाहेर निघून जातो.
मोसंबी आणि पुदिना
या ड्रिंकमध्ये पर्याप्त मात्रेत व्हिटॅमिन असतात, जे यूरिक ऍसिडाच्या स्तराला कमी करण्यास मदत करतात. याचे सेवन करण्यासाठी मोसंबीचे साल काढून त्याच्या बारीक बारीक फोडी करून त्यात लिंबाचा रस आणि पुदिन्याचे पान घालावे व या मिश्रणाला मिक्सीतून फिरवून त्याच्या ज्यूस काढावा व त्याचे सेवन करावे.
ब्लॅक चेरी आणि चेरी
ब्लॅक चेरी आणि चेरीचा ज्यूस यूरिक ऍसिडमुळे होणारे संधिवात किंवा किडनी स्टोनच्या समस्येसाठी योग्य आहे. ब्लॅक चेरी यूरिक ऍसिडच्या सीरम स्तराला कमी करून संधिवात आणि किडनीहून क्रिस्टल दूर करण्यास मदत करते. यात ऐंटीऑक्सीडेंट आणि ऐंटी इंफ्लेमेंटरी गुण देखील असतात, जे यूरिक ऍसिडला कमी करण्यास मदत करतात.
खीर्‍याचा सूप
खीर्‍याचा सूप शरीराला हाइड्रेड ठेवण्यासोबत यूरिक ऍसिडच्या स्तराला कमी करतो. याचे सेवन करण्यासाठी एका भांड्यात खिर्‍याचा ज्यूस, पाव कप योगर्ट, पुदिन्याचे पान आणि लिंबाचा रस घालून मिक्सरमधून फिरवून घ्या आणि थोड्यावेळाने गार झाल्यावर त्याचे सेवन करा.
सेबचा सिरका
सेबचा सिरका शरीरातून यूरिक ऍसिडला दूर करण्यास मदत करतो. अंटीऑक्सीडेंट आणि एंटीइंफ्लेमेंटरी गुणांमुळे हे शरीरात क्षारीय ऍसिड संतुलन बनवून ठेवतो. हा सिरका रक्ताच्या पीएच वॉल्यूमला वाढवून यूरिक ऍसिडला कमी करण्यास मदत करतो.
अनानसचा ज्यूस 
या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी सोबत इतर एंटीऑक्‍सीडेंट असतात जे यूरिक ऍसिडच्या स्तराला कमी करून शरीरातून बाहेर काढण्यात मदत करतात. याचे सेवन केल्याने शरीराला दुसरे इतर फायदे देखील मिळतात.