आला उन्हाळा, हे विसरला तर नाही
उन्हाळा आल्यावर अनेकदा शरीराला नवीन तापमानाशी जुळवून घेण्यात वेळ लागतो. अशात काही लहान आणि सामान्य गोष्टी असतात ज्यांचा आम्हाला विसर पडत असतो तर त्यांना रिकॉल करायला कुठलीच हरकत नसावी.
आता गरज आहे घरातून बाहेर निघताना सन स्क्रीन लोशन लावण्याची आणि स्कीन झाकून निघण्याची. सोबत पाण्याची बॉटल किंवा ग्लूकोज असणे उत्तम. कॉटनचे हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे योग्य ठरेल.
आहार बदल सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. म्हणून आता मसालेदार, स्पाईसी, तळकट खाणे टाळा. लिक्विड डाइट अधिक घ्या. घरातून बाहेर पडण्यापूर्वी लिंबू पाणी, ताक, किंवा फ्रूट ज्यूसचे सेवन करणे विसरू नका.
उन्हाळ्यातील फळं कलिंगड, काकडी, खरबूज, द्राक्ष, संत्री, स्ट्रॉबेरी, नारळ पाणी, आंबा आपल्या आहारात सामील करा.
उन्हाळ्यात रॉक साल्ट, जिरं, बडीशेफ आणि वेलची सारखे मसाले वापरून दही, कैरीचं पना, पुदिना, थंडाई, सातू हे सेवन करणे शरीरासाठी अनुकूल ठरेल.
अती तापमान असल्यास शक्योतर 11 ते 4 या दरम्यान घरातून किंवा ऑफिसातून बाहेर पडणे टाळावे.