शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (21:33 IST)

नवतपा मध्ये या 10 सावधगिरी बाळगा

नवतपाच्या दिवसात उष्णता प्रखर असते.आपण घराच्या आत असाल किंवा घराबाहेर जीव कासावीस करण्यासाठी हे पुरेसे आहे. या दिवसात प्रत्येकाचे मन कुठे बाहेर जायला इच्छुक आहे. घरात बसून कंटाळा आला आहे. परंतु सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन लागले आहे आवश्यक काम असेल तरच बाहेर पडावे वेळोवेळी हे सांगण्यात येत आहे.आपल्याला देखील या दिवसात बाहेर जावे लागत असेल तर काही खबरदारी घ्यावी.चला जाणून घेऊ या.  
 
1 नवतपाच्या दिवसात शक्यतो घराच्या बाहेर काहीही खाल्ल्याशिवाय जाऊ नका.
 
2 आपले संपूर्ण शरीर कपड्याने झाकून घ्या.टोपी लावा,कान झाकून घ्या.डोळ्यांवर सनग्लासेस लावा.
 
3 एसी मधून एकदम उन्हात जाऊ नका.
 
4 जास्तीत जास्त पाणी प्या. या मुळे घाम येईल आणि आपले तापमान नियमित होऊन निश्चित होईल आणि शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही.
 
5 दररोज कांद्याचे सेवन करा.आपल्या जवळ कांदा बाळगा.
 
6 जास्त उन्हाळ्यात हंगामी फळे,फळांचा रस,दही,ताक, जिरे ताक,जलजीरा,लस्सी,कैरीचे पन्हे किंवा कैरीची चटणी खा.
 
7 हलके आणि सुपाच्य जेवण घ्या.
 
8 मऊ,मुलायम,सूती कपडे घाला.या मुळे घाम आल्यावर ते शोषून घेतील.
 
9 तळकट आणि मसालेदार गोष्टींपासून लांब राहा,या मुळे आपल्या पोटात बिघाड होऊ शकतो.
 
10 या व्यतिरिक्त, वेळोवेळी आवश्यकतेनुसार ग्लूकोजचे सेवन करत रहा आणि उर्जा अनावश्यकपणे वापरू नका.