मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (16:54 IST)

डोळ्यांची काळजी घेताना या चुका करू नका

काही जणांची सवय असते की ते झोपून उठल्यावर आपले डोळे चोळतात किंवा डोके थकल्यावर आपल्या डोळ्यांना चोळतात. जर आपण देखील अश्या लोकांमध्ये सामील असाल तर असे करू नका. अजून देखील वेळ गेलेली नाही. कारण जर आपल्याला ही सवय आहे तर आजच या सवयीला मोडून टाका किंवा सोडून द्या. कारण जेव्हा आपण डोळे चोळता तेव्हा आपल्या डोळ्यांचे फार नुकसान होतात. चला तर मग जाणून घेऊया डोळे चोळण्याचा धोक्याबद्दल.
 
1 आपण आपल्या डोळ्यांना जोरात चोळत असल्यास, आपल्या डोळ्यांचे फार नुकसान होतं. आपण आपल्या डोळ्यांना चोळल्यावर आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते आणि मज्जातंतूचे देखील नुकसान होऊ शकतं. त्याच बरोबर आपण अंशतः देखील आंधळे होऊ शकतात. जर आपल्याला कोणत्याही प्रकारे डोळ्यांचा आजार झाला असल्यास तर आजच या सवयीला सुधारून टाका.
 
2 काही लोकं आपल्या डोळ्याला जोरा जोराने चोळतात. यामुळे आपल्या कार्नियाला नुकसान होऊ शकतं, आणि यामुळे गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. कधी कधी आपण आपल्या डोळ्यात काही गेल्यावर आपल्या डोळ्यांना वेगावेगानं चोळू लागतो. जेणे करून डोळे स्वच्छ होतील. परंतु खरं तर, आपल्याला असे करायला नको कारण अशामुळे कार्निया फाटू शकतं, किंवा त्यावर ओरखडा येऊ शकतो.
 
3 आपण हाताला स्वच्छ न करता देखील आपल्या डोळ्यांना हात लावतो, डोळ्यांना चोळतो, तर आपल्या हातामधील जंत आपल्या डोळ्यात हस्तांतरित होतात आणि त्रास सुरु होतो. नंतर हे जंत संसर्गाला कारणीभूत असतात, जसे की कंजक्टिवाइटिस किंवा डोळे येणं.
 
4 आपल्या डोळ्यांना चोळण्यापासून टाळा. हात न धुता आपल्या डोळ्यांना हात लावू नका.
 
5 आपण गडद वर्तुळापासून त्रस्त आहात? आणि आपल्याला या पासून सुटका होऊ इच्छिता? तर आपल्या डोळ्यांना चोळण्याच्या सवयीला सोडून द्यावं. डोळ्यांना चोळल्याने फक्त गडद मंडळेच होतं नाही, तर या मुळे आपल्या रक्तवाहिनी देखील खंडित होऊ शकतात.