बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (09:09 IST)

रात्री दूध पिण्याची सवय असेल तर या गोष्टींची काळजी घ्या

निरोगी राहण्यासाठी आणि हाडांना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध शरीराला ऊर्जा देतो. तसेच म्हातारपणात होणाऱ्या हाडांच्या त्रासाला देखील कमी करतो. म्हणून नियमानं दुधाचे सेवन करणे फायदेशीर मानले आहे. बरेच लोक रात्री दूध पिऊन झोपणे पसंत करतात. तर काही लोक सकाळी न्याहारीच्या वेळी दूध पितात. पण काय रात्री दूध प्यावं ? जाणून घेऊ या.
 
असं मानले जाते की रात्रीच्या वेळी दूध पिणे चांगले आहे. रात्री हलकं कोमट दूध प्यायल्यानं झोप चांगली येते. या मुळे शरीराला आराम मिळतो. पण रात्री दूध पीत असाल तर या काही गोष्टी लक्षात असू द्या.
 
1 बऱ्याच लोकांची सवय असते, जेवल्यानंतर दूध पिण्याची. परंतु जेवल्यानंतर कधीही दुधाचे सेवन करू नये. हे पचायला वेळ लागतो आणि शरीराला जडपणा जाणवतो. 
 
2 जेव्हा जेवल्यानंतर दूध पिता तर कमी जेवावं, अन्यथा पचनक्रियेच्या समस्यांमुळे अस्वस्थ होऊ शकता. विशेषतः रात्री काळजी घ्या.
 
3 आंबट किंवा खारट गोष्टींचे सेवन दूध पिण्याच्या अर्ध्यातासा पूर्वी किंवा एक तासापूर्वीच करावं किंवा दूध पिणे झाल्यावर सेवन करावे. जर असे केले नाही तर ढेकर येण्याचा त्रास होऊ शकतो.
 
4 कांदा आणि वांग्यासह दुधाचे सेवन करू नये. या मध्ये असलेले रसायन आपसात क्रिया करून त्वचेच्या आजाराला उद्भवतात. म्हणून ह्याच्या सेवन करण्यात काही वेळेचा अंतर राखा.
 
5 मासे किंवा मांसासह दूध कधीही घेऊ नये. या मुळे आपल्याला त्वचे वर पांढरे डाग किंवा ल्युकोडर्माचा त्रास होऊ शकतो. या शिवाय या दोघांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे पचनास जास्त वेळ लागतो.
 
6 जर आपण सामर्थ्य आणि पोषण साठी दूध पीत आहात, तर या साठी गायीचे दूध प्या.पण जर वजन वाढवायचे आहे तर या साठी म्हशीचे दूध प्या. म्हशीचे दूध कफ वाढविण्याचे काम करतो हे लक्षात ठेवा.
 
7 कधीही थंड दूध पिऊ नका, ह्या मध्ये साखर देखील मिसळू नका. थंड दूध हळू-हळू पचतं ज्यामुळे पोटात गॅस होऊ शकते. आणि साखर पोषक घटकांना नष्ट करते आणि पचनाची समस्या निर्माण करते.