बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

किसमे कितना है दम?

आयपीएलच्या दुसर्‍या सत्राची सुरवात १८ एप्रिलपासून होते आहे. पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सने सार्‍यांना धुळ चारत विजेतेपदाचा करंडक पटकावला होता. यावेळी काय होईल? म्हणूनच मैदानात उतरण्यापूर्वी 'कौन कितने पानी में' हे जाणून घेऊया.

चेन्नई सुपर किंग्ज- भारताचा 'यशस्वी' कर्णधार महेंद्रसिंह धोनी या संघाचे नेतृत्व करतो आहे, ही जमेची बाजू आहे. धोनी कर्णधार व फलंदाज म्हणूनही यशस्वी आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रातही त्याने हे दाखवून दिले आहे. गेल्या वेळी संघाने फायनलमध्ये धडक मारली हे धोनीचे कर्तृत्व सिद्ध करायाला पुरेसे आहे. सुरेश रैना, मखाया एंटिनी, मॅथ्यू हेडन व मुथय्या मुरलीधरन यासारखे चॅंपियन खेळाडू संघात आहेत..

मायनस पॉईंट- संघाची खालची फळी कमकुवत आहे. युवा व स्टार खेळाडूंमुळे त्यांच्यावर दबाव आहे. थोडक्यात स्टार खेळाडूंवर सगळी दारोमदार.
---------------------
राजस्थान रॉयल्स- गेल्यावेळचा विजेता संघ. त्यामुळे यावेळीही गतविजेते म्हणून पाहिले जाणार. यावेळी मात्र लढत तितकी सोपी नाही. शेन वॉर्न कर्णधार म्हणून यशस्वी ठरला होता. यावेळीही तो त्याची पुनरावृत्ती करेल ही आशा. गेल्यावेळचा विजय हा या स्पर्धेत प्रोत्साहन देणारा ठरेल. ग्रीम स्मिथ घरच्या मैदानावर खेळत असल्याने भरात येऊन खेळेल.

मायनस पॉईंट्स- युवा खेळाडूंना आफ्रिकेत खेळणे तितके सोपे जाणार नाही. गेल्या वेळचे स्टार खेळाडू शेन वॉटसन, सोहैल तनवीर यांची कमतरता जाणवेल.
-----------------
कोलकता नाईट रायडर्स- शाहरूख खान यंदा तर जिंकण्याच्या इराद्यानेच संघाला मैदानात उतरवेल. गेल्या वेळच्या चुका टाळून कोच जॉन बुकानन जिंकण्याचा नवा प्लॅन राबवतील ही अपेक्षा. कोच बुकाननची रणनीती, बारकाईने प्रतिस्पर्धी संघांचा केलेला अभ्यास व ख्रिस गेलसारख्या स्फोटक खेळाडूची उपस्थिती फायदेशीर ठरेल.

मायनस पॉईंट- कर्णधारपदावरून हाकललेला सौरव गांगुली या स्पर्धेसाठी कितपत योगदान देईल ही शंका. रिकी पॉंटींग, शोएब अख्तर, डेव्हिड हसी व इतर अनेक खेळाडूंची अनुपस्थिती संघाला त्रासदायक ठरेल.
-----------------
दिल्ली डेअरडेव्हिल्स- वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखालील हा संघ आक्रमक आहे. सेहवाग, गौतम गंभीर, तिलकरत्ने दिलशान, पॉल कॉलिंगवूड, ए.बी. डिव्हिलियर्स, ओवेस शहा हे दणकेबाज फलंदाज संघात आहेत. शिवाय ग्लेन मॅकग्रा, आशीष नेहरा, महारूफ, डॅनियल व्हिट्टोरी हे गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरविण्यास पुरेसे आहेत.

मायनस पॉईंट- निर्णायक क्षणी संघाची कामगिरी चांगली होत नाही, हा इतिहास आहेत.

------------
मुंबई इंडियन्स- सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला यावेळी विजयाला गवसणी घालायची आहे. साथीला सनथ जयसूर्यासारखा अनुभवी फलंदाज आहे. याशिवाय शॉन पोलॉकसारखा अनुभवी मेंटर आहे. पोलॉकला आफ्रिकी खेळपट्ट्या माहिती आहेत. त्यामुळे तो चांगल्या टिप्स देऊ शकतो. झहिर खान व जेपी ड्युमिनी ट्रंप कार्ड ठरू शकतात. आणि हो लसिथ मलिंगा काय जादू घडवतो याकडेही लक्ष द्यावे लागेल.

मायनस पॉईंट- संघाच्या खालच्या स्तरात चांगले फलंदाज नाहीत.
-----
डेक्कन चार्जर्स- गेल्या वेळी हा संघ गुण तालिकेत सगळ्यांत शेवटी होता. आता या संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियाच वेगवान माजी फलंदाज एडम गिलख्रिस्ट आहे. कोचही डेरेन लेहमन आहे. यावेळी हा संघ जोरदार पुनरागमन करण्याची अपेक्षा आहे.

मायनस पॉईंट्स- स्टार खेळाडूंवर अवलंबून राहिल्यास निराशाच पदरी पडेल.

----------------
बेंगलुरू रॉयल चॅलेंजर्स- विजय माल्या यांच्या या संघाची धुरा इंग्लंडचा आक्रमक फलंदाज केवीन पीटरसनच्या हातात असेल. कर्णधार बददल्याने कामगिरी सुधारेल अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे. संघात रॉबिन उत्थप्पा हा स्थानिक चेहरा आहे. संघाची गोलंदाजीही मजबूत आहे.

मायनस पॉईंट्स- यातील अनेक खेळाडू ट्वेंटी-२० साठी फीट नाहीत. पीटरसन या स्पर्धेतच मायदेशी वेस्ट इंडिजविरूद्धची मालिका खेळण्यासाठी परतेल. संघाचा मालक विजयासाठी हपापलेला आहे. सहाजिकच त्याचा मोठा दबाव खेळाडूंवर असेल.
---
किंग्ज इलेव्हन पंजाब- नेस वाडिया व प्रीती झिंटाचा हा संघ संतुलित वाटतोय. मधली फळीही मजबूत आहे. रवी बोपारा यावेळी संघात आहे. कर्णधार युवराजसिंह यावेळी चमत्कार दाखवून संघाला विजयापर्यंत नेईल अशी आशा आहे.

मायनस पॉईंट्स- जेम्स होप, शॉन मार्श, ब्रेट ली हे खेळाडू फार काळ संघासाठी खेळू शकणार नाही. त्यामुळे संघासाठी त्यापुढचा काळ कठीण असेल.