केपलर वेसल्स- चेन्नई सुपर किंग संघाचे प्रशिक्षक
पूर्ण नाव: केपलर क्रिस्टोफेल वेसेल्सजन्म: 14 सप्टेंबर, 1957, ब्लोमफॉन्तेन, दक्षिण आफ्रिका.केपलर वेसेल्स दक्षिण आफ्रिकेचे एक अष्टपैलू खेळाडू होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा तो काही काळ कर्णधारही होता. वेसल्सला क्रिकेटबरोबर बॉक्सिंगचीही आवड आहे. सडपातळ बांधा असलेल्या वेसल्सने ऑस्ट्रेलियाकडून आपल्या करिअरची सुरवात करताना पहिल्याच सामन्यात 162 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजविरूद्ध झालेल्या मालिकेत त्यांनी 56 धावांची सरासरी ठेवली होती. या सामन्यात वेसल्सने शास्त्रीय पद्धतीने खेळ करून ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांना खूश केले होते. पण ऑस्ट्रेलियात जास्त दिवस न राहता तो आपला मायदेश दक्षिण आफ्रिकेत गेला. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना वेसल्सने संघाला शानदार सुरवात करून दिली. ऑस्ट्रेलियासाठी त्यांनी 24 कसोटी सामन्यात 43 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरवात केली. परंतु, 2006 च्या दरम्यान त्यांनी कोचिंग सोडून दिले.