मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 16 एप्रिल 2023 (15:40 IST)

Sunday special Funny Joke :संडे स्पेशल फनी जोक्स

jokes
नवरा बायको जोक - बायको बाहेर जाते  
बायको- अहो ,मी दोन तासासाठी बाहेर जात आहे ..
तुम्हाला काय हवं आहे का ?
नवरा- मला तेच हवयं...
नवरा बायकोचं भांडण सुरु.  
 
 
भन्नाट मराठी जोक- वजन कमी होत नाही  
 
4 महिने दररोज 10 किमी सायकलवर फिरून येते 
तरीही वजन काही कमी होत नाही. 
मग आता असं वाटते की, नुसतं मागे बसून 
वजन काही कमी होणार नाही 
सायकल स्वतः चालवावी लागेल. 
 
 
 नवीन कपडे 
चेंजिंग रूम मधून एखादा पुरुष नवी पॅन्ट  
घालून बाहेर आल्यावर 
 परदेशातील बायको- वाव ! यु आर लुकिंग कूल मॅन...!
भारतीय बायको -अहो मी काय म्हणते एकदा खाली 
मांडी घालून बसून बघा ,जमतंय की नाही !!!!
 
नवऱ्याचा स्वभाव 
माझा नवरा बावळट आहे 
असं काही बायका म्हणू शकत नाही.
म्हणून त्या म्हणतात ''आमचे हे सरळ आणि साधे आहेत. 
ह्याच्या अश्या स्वभावामुळे हे जरा मागेच राहिले नेहमी !!!