शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (19:00 IST)

खिडकी उघडणार नाही

कॉलेज मधे तोंडी परिक्षा सुरु असते, 
पहिला मुलगा आत जातो 
शिक्षक – तु रेल्वेने जातोय आणि तुला
गरम व्हायला लागले तर तू काय करशील?
विद्यार्थी – मी पंखा लावीन
शिक्षक – जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर 
विद्यार्थी- मी खिडकी उघडले
शिक्षक-  उत्तम ! आता मला सांग रेल्वे ८० कि मी  प्रति तासाने जात आहे तसेच खिडकीची लांबी आणि रुंदी 2×2 आहे 
तर डबा थंड होण्यासाठी किती वेळ लागेल
विद्यार्थीला उत्तर येत नाही व त्याला बाहेर जायला सांगतात
 
दुसरा विद्यार्थी येतो
शिक्षक – तु रेल्वेने जातोय आणि तुला
गरम व्हायला लागले तर तू काय करशीला 
दुसरा विद्यार्थी – मी पंखा लावीन
शिक्षक – जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर
दुसरा विद्यार्थी- मी शर्ट काढीण
शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकाडा खुप आहे
दुसरा विद्यार्थी- मी पॅन्ट पण काढेण
शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकडुन मरेल इतकी गरमी आहे
दुसरा विद्यार्थी- मी उकडुन मेलो तरी चालेल पण खिडकी उघडणार नाही .
 
Edited by - Priya Dixit