1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

तुमचे कपाळच सांगेल तुम्‍ही किती वर्ष जगणार

शरीर शास्‍त्रानुसार व्‍यक्‍तीच्‍या कपाळावरील रेषांवरून त्‍याचे आयुष्‍य ठरवता येते. त्‍यासाठी त्‍या व्‍यक्‍तीच्‍या कपाळावरील रेषा, आकार, रंग याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. 

1. व्‍यक्‍तीच्‍या कपाळावर जर दोन रेषा दिसत असतील तर त्‍याला साधारणपणे 60 वर्षांचे आयुष्‍य लाभते.

2. कपाळावर जर तीन रेषा असतील तर ती व्‍यक्‍ती 75 वर्षे इतके जगू शकते. तसेच कपाळ मोठे असेल तर आण्‍ाखी जास्‍त आयुष्‍य प्राप्‍त होते.

3. कपाळ छोटे जरी असले तरी त्‍यावर जर चार रेषा असतील तर त्‍याला 75 वर्षे आयुष्‍य मिळते.

4. कपाळावर जर पाच रेषा असतील तर तो व्‍यक्‍ती 100 वर्षांपर्यंत जगू शकतो.

5. कपाळाच्‍या वरच्‍या भागावर पाचपेक्षा जास्‍त रेषा असतील तर त्‍या व्‍यक्‍तीला मध्‍यम आयुष्‍य आणि जर लहान कपाळ असेल तर त्‍याचे आयुष्‍य अल्‍प असते.

6. कपाळावरील दोन रेषा एकमेकांना स्‍पर्श करत असतील तर त्‍या व्‍यक्‍तीची आयुमर्यादा 60 वर्ष इतकी असते.

7. जर व्‍यक्‍तीच्‍या कपाळावर रेषाच नसेल तर त्‍याला 25 ते 40 या वर्षांदरम्‍यान त्रास होतो.