तुम्ही या गोष्टी करता का, ज्याने लक्ष्मी रुष्ट राहते?
तुम्ही परिश्रम करूनही सतत पैशाची तंगी असते ? असे होण्यामागे काय कारण असेल बरं ? तुमच्याकडून चुकून अशा गोष्टी होतात की ज्यामुळे लक्ष्मी रुष्ट होते. लक्ष्मी नाराज झाल्याने तुम्हाला सतत पैशाची चणचण भासते.-
वेद-पुराणांनुसार जो माणूस सूर्योदयानंतरही झोपतो किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याच्यावर लक्ष्मी रुष्ट होते. याशिवाय दिवसा झोपल्यामुळेही लक्ष्मी नष्ट पावते.-
घरात किंवा दुकानात दुर्गंधी असेल तर लक्ष्मी नाराज होते.-
घरात आरडा-ओरडा किंवा सतत भांडणे होत असतील तर लक्ष्मी त्या घरात निवास करत नाही.-
ज्या घरात सतत नवरा बायकोंत भांडणे सुरू असतात तिथे लक्ष्मी राहात नाही. -
ज्या घरात स्वच्छता नसते त्या घरावर लक्ष्मीची कृपा होत नाही.