बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2012
Written By वेबदुनिया|

'पिंडदान' मोक्ष प्राप्तीचा मार्ग...

- रजनीश बाजपेई

WD
पितृपक्षात दिवंगत आत्माला चिरशांती लाभण्यासाठी पिंडदान करणे आवश्यक असल्याचे हिंदूधर्मात सांगितले आहे. आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून लाखो भाविक पितृपक्षात तिर्थक्षेत्रावर जाऊन पूर्वजांप्रती पिंडदान करून कृतज्ञता व्यक्त करत असतात. 'पिंडदान' हा मोक्ष प्राप्तीचा एक सहज व सरळ मार्ग सांग‍ितला आहे.

पितृपक्षात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्रावर लाखो भाविक पिंडदान करून पितरांच्या आत्म्यास शांती मिळून त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी पुजा अर्चा करत असतात.
श्रीप्रभु राम व सीतामाता यांनी राजा दशरथ यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून गया येथे 'पिंडदान' केले होते.

'पिंडदान' म्हणजे काय?
'पिंड' या शब्दाचा अर्थ म्हणजे एखाद्या वस्तुचे गोलाकार रूप होय. प्रतिकात्मक रूपात शरीराही पिंड म्हणले जाते. मृत व्यक्तीच्या संदर्भात दोन्ही अर्थ वापरले जात असतात. पितर तृप्त व्हावा म्हणून तांदुळ शिजवून भात तयार केला जातो. तसेच इतर मिष्ठान्न तयार केले जाते. त्यांना एकत्र करून गोलाकृतिक 'पिंड' तयार केले जातात. आपल्या पूर्वजांप्रति तयार केलेले पिंड 'दान' अर्थात अर्पण केले जातात.