साप्ताहिक भविष्यफल ( 26 ते 4 मार्च 2012)
मेष राशीतील शुक्र आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव देणारा राहील. मनातील कल्पना आकार घेतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. कवि, कलाकार, गायक, धर्मोपदेशक, शिक्षक यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल फलदायी आहे. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. स्वत:च्या कुटुंबासाठी खर्च कराल. शुभदिनांक २७.वृषभ स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्या घटना घडतील. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील. नवीन वस्रालंकारांची खरेदी होईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. घरात शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. शुभदिनांक २९. मिथुन मित्रपरिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. आपल्या सहकार्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. शुभदिनांक २, ३.कर्क दशमस्थ गुरु, शुक्रावरुन होणारे चंद्राचे भ्रमण कवि, कलाकार, गायक, वादक यांना चांगल्या संधी देणारे आहे. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. संतांचा सहवास लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल. शुभदिनांक २८. सिंह भाग्यातील गुरु, शुक्रामुळे धार्मिक ठिकाणी भेटी देण्याचे योग येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीची पूर्तता होईल. जबाबदारीची कामे स्वीकाराल. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याच्यादृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. आजवर रेंगाळलेली कामे सहजपणे मार्गी लागतील. नवनवीन उपक्रम राबविण्यात यश येईल. नोकरीत स्थिरता लाभेल. मात्र नवीन नोकरी शोधणार्या तरुणांना अनिश्चितता वाटेल. कोणतेही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. प्रतिष्ठीत व्यक्तीचे सहकार्य लाभेल. सरकारी परवाने मिळवाल. शुभदिनांक २६, २७.कन्या दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्यावर सोपवू नका. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. भागीदारीत व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना लाभ होतील. अनपेक्षित धनप्राप्तीचे योग येतील. सासुरवाडीकडून फायदा होइल. जोडीदाराचा उत्कर्ष होण्यास अनुकूल ग्रहमान आहे. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. शुभदिनांक २९, १. तूळ आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. जनसंपर्कातून लाभ होतील. कवि, कलाकार, गायक, वादक, धर्मोपदेशक यांना समाजात प्रतिष्ठा लाभेल. नवोदिक कलाकारांना चांगल्या संधी चालून येतील. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. अंध:श्रद्धेला बळी पडू नका. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळावे. शुभदिनांक २६, २७.वृश्चिक मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. शुभदिनांक २९.धनू आपल्या आवडत्या छंदांना व्यावसायिक स्वरुप देता येईल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांतून चांगले यश लाभेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. वरीष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. व्यवसाय उद्योगासाठीची कर्ज प्रकरणे मंजूर होतील. संशोधनपर अभ्यासक्रमाची पूर्तता होईल. शुभदिनांक २८.मकर घरात मंगलकार्याची नांदी होईल. जोडधंद्यातून लाभ होतील. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. शुभदिनांक १.कुंभ आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. समाधान लाभेल. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्यावर सोपवू नका. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. शुभदिनांक ३. मीन आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. जाणीवपूर्वक आपल्या विचारसरणीत केलेल्या अनुकूल बदलामुळे फायदा होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. शुभदिनांक २, ३.