शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2012
Written By वेबदुनिया|

तुमचे केस सांगतील चांगले होणार की वाईट?

WD
ज्योतिष शास्त्रानुसार केसांकडे पाहून तुम्ही ओळखू शकाल की पुढे काय होणार आहे ? जाणून घ्या केसांची जादू...

विरळ केस हे उत्तम स्वभाव, उदारता, प्रेम, दया, मृदुता, संकोच आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. तुमचे केस विरळ होऊ लागले असतील तर समजून घ्या की तुमच्या स्वभावात वर सांगितल्याप्रमाणे बदल होऊ लागेल.

याउलट तुमचे केस जर मोठे आणि कडक होऊ लागले असतील तर असे होणे हे चांगले आरोग्य आणि उच्च जीवनशक्तीचे प्रतिक आहे, हे ध्यानात घ्या.

साधे सरळ केस आत्म संरक्षण, सरळ स्वभाव, सरळ कार्यप्रणाली आणि स्वदिष्टतासूचक असतात. जर तुमचे केस साधे सरळ होऊ लागले असतील तर वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या स्वभावात बदल होऊ लागेल.

तुमचे केस दाट होऊ लागले असतील तर तुम्ही विद्याप्रेमी व्हाल. हळू हळू तुमचे केस कमी होत असतील तर समजून घ्या की तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होणार आहे.