विवाहेच्छुक व गर्भवतींना 12-12-12ची प्रतीक्षा
12-12-12
ही या शताब्दीमधील अखेरची संस्मरणीय तारीख आहे. आता अशी आकड्यांची जादू आणखी शंभर वर्षांनी (त्यावेळेच्या मंडळींना) पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही अनोखी तारीख आपल्या आयुष्यात पक्की करण्यासाठी अनेक लोक धडपडत आहेत. अनेक जोडप्यांना या दिवशी लगीनगाठ बांधून घेण्याची घाई लागली असून अनेक गर्भवतींना या दिवशी आपल्या अपत्याचा जन्म व्हावा असे वाटत आहे. 12-12-12 या दिवशी दुपारी बारा वाजून बारा मिनिटे व बारा सेकंदांच्या 'शतकातील एमेव मुहूर्ता'वर लग्न करण्याची अनेकांची इच्छा आहे. त्या दिवशी लग्न होण्याचा चान्स चुकवणार्यांच्या तोंडावर 'बारा' वाजण्याच्या शक्यता आहे. अनेक भावी वधू आपल्या भावी वरांना 'आता वाजले की बारा' अशी आठववण करून देत आहेत. या दिवशी जन्मलेले मूल भाग्यवान असेल अशी ग्वाही ज्योतिषीही देत आहेत. त्यामुळे अनेक भावी मातांना आपले अपत्य याच दिवशी जगात यावे, असे वाटत आहे. काहींनी तर तया दिवशीच्या सिझेरियनचीही तयारी केल्याचे म्हटले जात आहे.