मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2012
Written By वेबदुनिया|

साप्ताहिक भविष्यफल

WD
मेष : या आठवड्यात आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव कायम राहील. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याची जामीन देणे टाळा. आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर चांगली वेळ घालवा.

वृषभ : आपणास या वेळी काही प्रेमपूर्ण अनुभव येऊ शकतात व हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक विशेषतेंना देखील प्रेरणा आली आहे. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फळदायी आहे.

मिथुन : विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. या आठवड्यात आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा.

कर्क : स्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. उत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.

सिंह : मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल.नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. आपणास ध्येय मिळविण्यात पूर्ण यश मिळेल.

कन्या : कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्य पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल व शीघ्र अनुकूल परिस्थिती देखील मिळतील. उत्तम अन्नाचे सुख मिळेल. मित्र आनंद देतील. महत्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते. मानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

तूळ : सध्या आपल्याकडे भरपूर शारीरिक ताकद व आत्मविश्वास आहे आणि आपण सहजरीत्या नवीन आह्वाने पेलता. आपणास भिती वाटत नाही व इतर लोकांच्या सहमतीवर कमी विसंबून असता. महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.

वृश्चिक : उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने आनंद होईल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. खरेदीसाठी उत्तम वेळ. आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल.

धनु : अव्यवस्था आपल्या योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. जर आपणास एखाद्या योजनेसाठी सहकार्य पाहीजे असेल तर असे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम सामान्यपणे चालू द्या.

मकर : संबंध विशेषरीत्या व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. विशेषरीत्या आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी. हा वेळ या विषयांवर जास्त ताण पाडण्याची नाही. आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील.

कुंभ : एखाद्या जिवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. चांगले भोजन व मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल.

मीन : आपणास आपल्या कार्याच्या वाढसाठी पैसा आणि वेळ लावावा लागू शकतो पण गुंतवणूकीला वादाचा विषय होऊ देऊ नका. नवीन लोकांना भेटायची तयारी ठेवा. महत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील. चाकरमान्याची परिस्थिती अनुकूल असेल. महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रूवर्ग पराभूत होईल.