शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2014
Written By वेबदुनिया|

कुंभ राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

WD

राश्याधिपती शनीचे भाग्यस्थानातील वास्तव्य गुरुचे पंचमस्थानातील भ्रमण तुम्हाल वर्षाची सुरुवात चांगली करून देणारे आहे. मात्र मंगळ वर्षभर तुम्हाला शांतता लाभू देणार नाही. तुमच्या अभ्यासू व संशोधक स्वभावाला अनुकूल असे ग्रहमान मिळाले आहे. ध्येयाचा आणि छंदाचा पाठपुरावा करा. मनमोकळे व्हा. लोकांपुढे तुमच्या समस्या मांडा, म्हणजे जिव्हाळ्याच्या व्यक्तींकडून साहाय्य मिळेल. तमुच्याबद्दलचे गैरसमज दूर होतील. गुरुचे भ्रमण शुभ असल्यामुळे तुमच्याकडे यश चालून येणार आहे.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी...


धंदा, व्यवसाय व नोकरी

WD


नोकरदार व्यक्तींना जूनपर्यंत एखादी चांगली संधी उपलब्ध होईल. त्यांच्या कौशल्याला मागणी राहील, पण मोबदल्याविषयी खात्री नसल्यामुळे कामात फारसे लक्ष नसेल. त्यानंतर मात्र एखादी मोठी जबाबदारी किंवा प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. त्याचा चांगला उपयोग होईल. त्यानिमित्ताने विशेष सवलती मिळतील. आर्थिकदृष्टया जरी वर्ष साधारण गेले तरी तुमच्या अधिकारात वाढ होईल. कलावंत व अभ्यासू शास्त्रज्ञांना मे, जूनला अचानक प्रकाशात येण्याची संधी मिळावी. इंजिनियर, शास्त्रीय शाखेत काम करणार्‍या मंडळींना जानेवारी, फेब्रुवारीत एखादी सुंदर कल्पना सुचून ते आपले नैपुण्य सिद्ध करतील.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...

गृहसौख्य व आरोग्यमा

WD

प्रकृतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नवीन वर्षात कौटुंबिक जीवनाची सुरुवात साधारणच होणार आहे. मनात इच्छा असूनही तुमच्या पद्धतीने कौटुंबिक सौख्याचा आनंद मिळणा नाही. कदाचित तुमच्या स्वत:चे आणि जोडीदाराचे करिअरमदील उद्दिश्ट हे कारण असू शकेल. नवीन जागा अथवा वाहनाचे बेत आखले जातील किंवा एखादी मोठी गुंतवणूक केली जाईल. संततीसौख्याच्या दृष्टीने जूनपर्यंतचा कालावधी चांगला आहे. कुंभ रास ही स्थिर गुणधर्माची, वायू तत्त्वाची जिचा अधिपती शनी, हर्शल आहे व चिन्ह ज्ञानामृत ओसंडत असलेला घडा आहे. शुभरंग निळा, जांभळा, शुभरत्न पाचू व आराध्य दैवत दत्त-मारुती आहे.