बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
 
चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती
 
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती
 
हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती
 
कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती
 
Lyrics - मंगेश पाडगांवकर
Singer - सुधीर फडके
Music - यशवंत देव