शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

सौ. रश्मी गुजराथी

ND
अक्षरा शेजारी उभा काना
शोभते उभी काठी
त्यावर काढता अर्ध गोल
वळण शोभे वेलांटी
दोन मात्रा उभ्या
भासतो का तुरा
पायाशी घेतो लोळण
उकार हा खुळा
ऊवर चंद्रकोर
त्यात टिंब, अनुस्वार
दिसतो शोभून ॐ
छान ज्याचा आकार