बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (16:03 IST)

झाडे लावा, झाडे जगवा

झुक झुक झुक झुक आगीनगाडी
पाण्याचे डबे आणून सोडी
वाळकी झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाचा गाव मोठा
पाण्याचा लय तोटा  
हंडा रांगेत लावु या  
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाची बायको सुगरण
पाण्यासाठी फिरते वणवण
बिनआंघोळीचे राहू या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी
पाण्यासाठी भांडु या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामा मोठा तालेवार
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार
कोरड्या पाण्याने न्हाऊ या
मामाच्या गावाला जाऊ या 
 
झाडे लावा, झाडे जगवा