शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

बोधकथा : भीती

अहमदाबादच्या महात्मा गांधी सायन्स लॅब्रोरेटरीमध्ये काही विद्यार्थी प्रयोग करत होते. प्रयोगशाळा त्या दिवसांत प्रख्यात वैज्ञानिक साराभाई यांनी नुकतीच सुरू केली होती. प्रयोगादरम्यान दोन मुलांकडून मोठी चूक झाली. 
ते दोघे खूपच घाबरले. आपल्याल आता मोठी शिक्षा भोगावी लागेल, असे त्यांना वाटू लागले. ते भीत-भीतच साराभाईंकडे गेले. साराभाईंनी त्यांना घाबरलेले पाहून विचारले, ‘का रे, काय झाले? इतके घाबरलात का?’ एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर, इलेक्ट्रॉनिक मोटर जळाली. त्यात  जरा जास्तच वीज गेली.’ हे ऐकून साराभाई भंकर संतापले. पण नंतर त्यांनी स्वत:ला सावरले आणि म्हणाले, ‘इतकंच! एवढय़ासाठी घाबरलात? प्रयोग करताना चुका ह्या होणारच. 
 
चुकल्याशिवाय कळणार कसं? पण पुढच्यावेळी प्रयोग करताना अधिक दक्षता घ्या. त्यामुळे नुकसान टळू शकतं.’ हे ऐकून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विद्यार्थी भारावून गेले. ते साराभाईंपुढे नतमस्तक झाले. 
 
वास्तविक, जी मोटार अशीच विद्यार्थ्यांच्या चुकींमुळे जळाली होती, ती खूपच महागडी होती. त्या दिवसांत बाजारात उपलब्ध देखील नव्हती. तरीही साराभाई विद्यार्थ्यांवर ओरडले नाहीत की बोल लावले नाहीत. उलट त्यांची भीती दूर केली. कारण भविष्यात प्रयोग करताना ते घाबरणार नाहीत. प्रयोग करताना त्यांनी प्रोत्साहित केलं. 
 
तात्पर्य : भीतीमुळे माणसे पुढे सरकत नाहीत, ती मागेच राहतात.