शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (14:32 IST)

Cooking Tips: झटपट नाश्ता तयार करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

घरातील महिला रात्रंदिवस स्वत:साठी आणि कुटुंबासाठी काही ना काही स्वयंपाक करत असतात. नोकरदार वर्गाच्या महिलांना दररोज सकाळी नाश्ता तयार करण्याची घाई असते. अशा वेळी काही वेळा नाश्ता तयार करण्यासाठी वेळ लागतो झटपट नाश्ता तयार करण्यासाठी या सोप्या टिप्स अवलंबवा जेणे करून तुम्हाला काही त्रास होणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
बॅटर ठेवा -
जर तुम्ही डोसा किंवा इडली कोणत्याही रविवारी किंवा वीकेंडला बनवत असाल. त्यामुळे पीठ शिल्लक राहते. ते पूर्ण संपवू नका.उरलेले  हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पटकन बनवायची आणि खायला द्यायची असेल तेव्हा तुमच्यानुसार साहित्य वाढवा आणि चीला, डोसा, उत्तपम, पॅनकेक बनवून झटपट नाश्ता तयार करा. 
 
कणिक उरली असल्यास -
बऱ्याच वेळा कणिक मळताना जास्त मळली जाते. पोळ्या  केल्यावर कणिक उरते अशा वेळी मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवावे. मुलांसाठी तुम्ही ड्रायफ्रुट्स घालून गुलगुले किंवा गोड पराठे तयार करू शकता. 
 
काही इन्स्टंट ठेवा-
तुम्ही झटपट नाश्ता बनवता आणि घरी बनवलेले अन्न मुलांना खायला घालता. पण फ्रिजमध्ये काही इन्स्टंट अन्न साठवून ठेवा. जेणेकरून घाई असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही झटपट नाश्ता बनवून  खाऊ घालू शकता. बाजारात शेवया पोहे, म्यूसली, ओट्स, मॅगी, रोल्स, टिक्की, मिनी समोसा असे अनेक प्रकारचे झटपट पदार्थ उपलब्ध आहेत. जे आपण फ्रिज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता.
 
काही साधने आवश्यक आहेत-
सकाळी घाई असेल तर पाणी गरम करायलाही वेळ लागतो. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक केतली ते चॉपर , मिक्स, इंडक्शन, ब्लेंडर, फूड प्रोसेसर यासारख्या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघराचा भाग बनवा. जेणेकरून तुमचा मौल्यवान वेळ वाचेल. 
 
 ग्रेव्ही तयार करून ठेवा- 
जर तुम्ही सकाळी किंवा रात्री मसालेदार करी बनवणार असाल. त्यामुळे त्याची ग्रेव्ही आगाऊ तयार करून फ्रीजमध्ये ठेवा. हे चार ते पाच दिवस चांगली राहील आणि तुम्ही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भाज्या तयार कराल. बहुतेक रेस्टॉरंट्स मध्ये  अशाच प्रकारे अनेक भाज्या तयार करतात.