शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : सोमवार, 18 जानेवारी 2021 (11:11 IST)

अतिशय उपयुक्त स्वयंपाकघरातील टिपा

*फ्रीजचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी आपल्याला गरम पाण्यात बेकिंग सोडा वापरला पाहिजे.
*तांदूळ शिजवताना एक चमचा तेल आणि लिंबाचे काही थेंब टाकल्याने भात मोकळा होतो.
*नूडल्स उकळ्यानंतर ते गाळून त्यावर गार पाणी टाकल्याने ते आपसात चिकटत नाही.
*मिरचीचे देठ तोडून फ्रीजमध्ये ठेवल्याने मिरची खूप काळ ताजी राहते.
*फुलकोबीची भाजी करताना त्यात 1 चमचा दूध मिसळ्याने रंग छान येतो.
*एक महिन्यात एकदा मिक्सरमध्ये मीठ टाकून चालवल्याने मिक्सरच्या ब्लेडची धार चांगली राहते.
*कडक लिंबू गरम पाण्यात थोड्या वेळासाठी टाकून ठेवल्याने लिंबातून खूप रस निघतो.