मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्हलेटर
Written By वेबदुनिया|

प्लीज एक्सेप्ट मी....

प्रती,
ND
कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही. कारण शेवट कदाचित मला माहीत आहे. आपली फारशी ओळखही नाही अजून. परंतु, तू मला आवडतोस. धक्का बसला ना? यापेक्षा जास्त धक्का मला स्वतः: ला बसला होता, जेव्हा मला हे जाणवलं, की तू मला आवडायला लागलास.

हे कसं झालं, त्याचा शोध मी स्वतः:च घेत आहे. बॉटनीच्या त्या पेपरमध्ये तू केलेली मदत... त्यानंतर वारंवार आपलं भेटणं.. याचा कधी असा परिणाम होईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं...

  हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........ तुला माझ्या बद्दल असं काही वाटतं का? ए खरं सांग ना प्लीज..... मला ना तुला हे सारं काही सांगायचं आहे, तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे.... पण      
आता त्याच स्वप्नात तू मला रात्रभर छळतोस.. परवा तर आई म्हणत होती, का गं आज काल जरा जास्त अभ्यास करतेस का? मी म्हटलं का? ती म्हणे आज काल रात्री झोपेत बडबडतेस ती? मला एकदम धस्स झालं. काय बडबडत असेन मी? बापरे तुझं नाव घेत असेल का? आईने ऐकले तर बोंबलंच सारं!

मला तुझ्या बद्दल हे जे काही वाटतं, त्यालाच प्रेम म्हणतात का? मला एकवेळ वाटलं, ज्या प्रमाणे मला अमीर खानही आवडतो, तसंच काही हे असेल.. पण नाही मी अमीर खानचा फोटो न पाहता आठवडा काढू शकते, पण मग तू, तू जर कॉलेजमध्ये दिसला नाहीस तर मग मला काय होतं, लेक्चरमध्ये तर लक्षच लागत नाही प्रॅक्टिकलमध्येही गडबड होते. परवा सरांच्या बऱ्याच शिव्या खाल्ल्या मी, या कारणांवरून. मी काय करतेय तेच मला कळत नव्हतं. मग मी विचार केला, आणि मला जाणवलं, तू नाही आलास ना आज? म्हणून कदाचित असं होत असेल.

आज तिसरा दिवस आहे, तू भेटला नाहीस.. म्हणून मी चक्क तुला हे पत्र लिहितेय.. (प्लीज अक्षरांना पाहून हसू नकोस) आणि मराठीच्या चुका तर मुळीच काढू नकोस. माझं हे अक्षर असंच आहे, आणि मराठीही.

पण मला असं का होतेय? लक्ष लागत नाही, झोप येत नाही, तुझी नुसती आठवण जरी आली, तरी गझल ऐकावी वाटते? का?
हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........ तुला माझ्या बद्दल असं काही वाटतं का? ए खरं सांग ना प्लीज..... मला ना तुला हे सारं काही सांगायचं आहे, तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे.... पण तू भेटतोसच कुठे आज- काल? आणि कॉलेजला आल्यावरही चटकन निघून जातोस हल्ली. ए काय झालंय तुला? प्लीज कदाचित माझ्याशी हे सारं शेअर केल्यावर तुला बरं वाटेल?

प्लीज माझं प्रेम एक्सेप्ट कर.....
तुझीच
कखग