गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्हलेटर
Written By वेबदुनिया|

नेपोलियन बोनापार्टचे जोसफिनला पत्र

नेपोलियन बोनापार्ट

(नेपोलियन बोनापार्ट केवळ एक शूर योद्धा व राजाच नव्हता तर एक चांगला पत्रलेखकही होता. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्याने 75,000 हून अधिक पत्रांचे लिखाण केले. त्यातील सर्वाधिक पत्र त्याने त्याची सुंदर पत्नी जोसफीन हिला लिहिले आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी लिहिलेल्या या पत्रांमधून भावी जगज्जेत्याची स्वप्ने अधोरेखित होतात.)

पॅरिस, डिसेंबर 1795

WDWD
डोळे उघडले आणि तुझ्या आठवणींनी मनात काहूर माजविलं. तुझी प्रतिमा आणि कालच्या रात्रीची धुंदी मनाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन गेली. माझ्या स्वप्नांना रंगविणारी जोसफीन तू माझ्यावर काय जादू केलीयस ग प्रिये.

तू रागावलेली तर नाहीस ना माझ्यावर? तुला माझी काळजी तर वाटत नाही ना सखे? तू कुठल्या चिंतेत आहेस गं प्रिये? तुझी अशी अवस्था पाहून माझे मन बेचैन होते. मी खुप प्रयत्न करूनही मग सावरू शकत नाही. अनेक भावना आणि अपेक्षांनी मन भरून येतं.

मी तुझ्या ओठांनी आणि तुझ्या हृदयाने माझे प्रेम रेखाटण्याचा प्रयत्न केला. ज्यात मी सारखा जळत राहिलो आहे. ओह! काल रात्री मला या गोष्टीची अनुभुती आली. तुझी प्रतिमा तुझे किती चुकीचे दर्शन घडविते. तू जवळ नसतेस ना तेव्हा तुझे खरे महत्त्व मला कळते. तू गेल्या नंतर आता तब्बल तीन तासांनी मी तुला पाहू शकेन. माझी राणी तोपर्यंतच्या क्षणांसाठी माझी हजारो चुंबने, तू मात्र मला बदल्यात काहीही देऊ नकोस नाही तर त्यामुळे माझ्या हृदयात आग लागेल.