शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By
Last Modified: गुरूवार, 13 नोव्हेंबर 2014 (12:53 IST)

९९ आयफोनचा नजराना देऊन ठेवला प्रेमाचा प्रस्ताव

प्रेयसीसमोर प्रेमाची कबुली देताना बर्‍याचजणांची छाती धडधडू लागते. आपल्या मनातील भावना तिच्यासमोर कशा व्यक्त कराव्यात, हेच त्यांना समजत नाही. मात्र चीनमधील एका तरुणाने आपली सहकर्मचारी असलेल्या तरुणीवरील प्रेमाची कबुली देण्यासाठी जी पद्धत वापरली आहे, ती सगळ्य़ांनाच थक्क करणारी ठरली आहे.

गुआंगझोऊ शहरातील या तरुणाने प्रेसयीला एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ९९ नव्याकोर्‍या आयफोनचा नजराना पेश करत प्रेमाची कबुली दिली. या महाशयांनी त्यावर आपली दोन वर्षांची तब्बल ८0 हजार डॉलरची बचत खर्ची घातली. मधल्या सुट्टीत ऑफिसच्या पार्किंगमध्ये या ९९ आयफोनच्या बॉक्सपासून बदामाचा आकार तयार करून त्यात तो गुलाबाचा गुच्छ घेऊन उभा राहिला. त्याला आवडणारी तरुणी केवळ ऑफिसातील अन्य सहकार्‍यांनी दबाव टाकल्यामुळे काहीसी संकोचतच त्याच्यापर्यंत पोहोचली. त्या तरुणाचे म्हणणेही तिने ऐकून घेतले, मात्र त्याच्या प्रस्तावास होकार व अन्य काही प्रतिक्रिया देण्याची घाई तिने टाळली. या घटनेमुळे चिनी सोशल मीडियामध्ये खळबळ उडाली असून अशा प्रकारे आमिष दाखवून प्रेम व्यक्त करण्याच्या प्रकारावर अनेकांनी नाजारी व्यक्त केली आहे. चीनमध्ये दरवर्षी ११ नोव्हेंबरला अशा आगळ्य़ा पद्धतीने प्रेमाचा प्रस्ताव ठेवण्याची प्रथा तरुणाईकडून पाळली जाते. पण तरीही या तरुणाने हे वर्तन अनेकांना खटकले आहे.